नवी दिल्ली: १४ डिसेंबर रोजी भारतीय वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमती हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात ०.२५% वाढीसह व्यवहार करत आहे. याशिवाय वायदा बाजारात आज चांदी कालच्या बंद किमतीच्या तुलनेत ०.४७ टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे.

बुधवारी वायदे बाजारात २४ कॅरेट शुद्धतेचे सोने कालच्या बंद किमतीपासून सकाळी ९.३० वाजेपर्यंत १३५ रुपयांनी वाढून ५४,८७८ रुपये प्रति १० ग्रॅमवर वाढले. आज सोन्याचा भाव ५४,७७० रुपये झाला. यानंतर एकदा किंमत ५४,८९० रुपयांपर्यंत पर्यंत गेला. तर काही काळानंतर पुन्हा ५४,८७८ रुपयांच्या पातळीवर घसरला.

मोठी बातमी : जळगावातील सराफा बाजारात सीबीआयचे पथक धडकले, छापेमारीचं कारण उघड
चांदीच्या दरातही वाढ
आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) चांदी देखील हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहे. कालच्या बंद भावावरून आज चांदीचा दर २७४ रुपयांनी वाढून ६९,०४९ रुपये प्रति किलो झाला आहे. चांदीचा दर आज ६८,८६६ रुपयांवर उघडला तर एकदा किंमत ६९,१११ रुपयांवर पोहोचली. याशिवाय गेल्या व्यापार सत्रात चांदीचा भाव ८२ रुपयांच्या वाढीसह ६८,२६७ रुपयांवर बंद झाला.

घरात किती तोळे सोनं, रोख रक्कम ठेवता येते? जाणून घ्या आयकर विभागाचे नियम
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर
दरम्यान, आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने लाल चिन्हावर व्यवहार करत आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. कालच्या बंद किमतीच्या तुलनेत बुधवारी सोन्याची स्पॉट किंमत ०.४% घसरून १,८०९ डॉलर प्रति औंस झाली. त्याच वेळी, चांदीचा दर ०.१३% कमी झाला आणि २३.६८ डॉलर प्रति औंस झाला. विशेष म्हणजे लग्नसराईच्या काळात गेल्या एका महिन्यात सोन्याच्या भावात २.१७% वाढ झाली असून चांदीचे दरही ३० दिवसांत ९.१७ टक्क्यांनी वाढले आहेत.

१३०० वर्षांपूर्वीची कबर खोदली, आत सापडला मौल्यवान खजिना, किंमती सोन्याचा हार अन् बरंच काही
सराफा बाजारात सोन्याचा भाव घरून बंद
यापूर्वी मंगळवारी भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आला. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव ८ रुपयांनी घसरून ५४,५३४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव ५४,५४२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. मात्र, चांदीचा भाव ८२ रुपयांनी वाढला आणि ६८,२६७ रुपये प्रति किलोवर पोहोचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here