नवी दिल्ली: जर तुम्ही भारतीय असाल आणि परदेशात कंपनीत काम करत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आली आहे. आज जगभरात करोडो भारतीय प्रत्येक क्षेत्रात आपली सेवा देत आहेत. दुसरीकडे, जगभरात कंपनी आपला खर्च कमी करण्यासाठी टाळेबंदी करत आहेत. कुठेतरी भारतीय देखील याला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत ईपीएफओने तुमच्यासाठी काही चांगल्या तरतुदी मांडल्या आहेत.

आनंदाची बातमी! PF खात्यात जमा होतेय व्याजाची रक्कम, तुम्हाला किती व्याज मिळणार? आत्ताच चेक करा
ईपीएफओने काय सांगितले
ईपीएफओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून अनेक गोष्टींकडे लक्ष वेधत आहे. अलीकडेच ईपीएफओने १३ डिसेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आंतरराष्ट्रीय नोकरदारांसाठी सामाजिक सुरक्षा करार (एसएसए) अंतर्गत समाविष्ट असलेल्या तरतुदींबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये कराराचे फायदे सांगितले, ज्याचा फायदा परदेशात काम करणारे भारतीय घेऊ शकतात.

नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी; आता तुमचा PF दावा वारंवार फेटाळला जाणार नाही, कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
सामाजिक सुरक्षा करार म्हणजे काय?

ईपीएफओने १९ देशांसोबत सामाजिक सुरक्षा करार (SSA) केला आहे. यात बेल्जियम, जर्मनी, स्वित्झर्लंड, डेन्मार्क फ्रान्स, लक्झेंबर्ग, दक्षिण कोरिया या देशांचा समावेश आहे. हा सामाजिक सुरक्षा करार भारत आणि अन्य देश यांच्यातील द्विपक्षीय करार असून, जे दुसऱ्या देशात पाठवलेल्या कामगारांच्या सामाजिक सुरक्षा कव्हरेजची सातत्य सुनिश्चित करते. एसएसए, हा दोन देशांमधील असा करार आहे, जो सीमेपलीकडील कामगारांच्या हिताचे संरक्षण करेल. हा करार सुनिश्चित करतो की यजमान देश आणि मायदेशातील कामगारांना सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने समान वागणूक दिली जाते.

विवाहित जोडप्यांसाठी आनंदाची बातमी, सरकार महिन्याला देईल १८,५००; आताच करा हे काम
SSA अंतर्गत कोणते फायदे

  • SSA मध्ये आयडब्लूसाठी यजमान देशातील कामगारांसोबत आरोग्य उपचार समानता असेल.
  • ज्या देशात सामाजिक सुरक्षेबाबत त्यांच्या देशाशी करार आहे अशा देशात काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार नियुक्त केले जातात. त्यांना यजमान देशामध्ये सामाजिक सुरक्षा व्यवस्थेत योगदान देण्याची आवश्यकता नाही.
  • आंतरराष्ट्रीय कर्मचार्‍यांसाठी घरच्या प्रदेशात राहण्याचा पर्याय निवडणार्‍या लाभार्थीसाठी तसेच तिसर्‍या देशात राहण्याचा पर्याय निवडणार्‍या लाभार्थीसाठी कोणतीही कपात न करता थेट पेन्शनरी लाभ देण्याची तरतूद असेल.
  • निवृत्ती वेतनसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी SSA देशात प्रदान केलेली सेवा भारतात प्रदान केलेल्या सेवेमध्ये जोडली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here