पानीपत: हरयाणाच्या पानीपतमध्ये इयत्ता पहिलीत शिकत असलेल्या मुलाचा करुण अंत झाला. घरापासून काही अंतरावरच त्यानं अखेरचा श्वास घेतला. लग्नाची वरात पाहण्यासाठी मुलगा घरातून बाहेर पडला होता. विजेच्या तारांसाठी लावण्यात आलेल्या लोखंडाच्या अवैध पाईपच्या संपर्कात आल्यानं चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आईची अवस्था अतिशय बिकट आहे. रडून रडून ती अनेकदा बेशुद्ध पडली आहे. परिसरावर शोककळा पसरली आहे.

पानीपतच्या हरिनगरात वास्तव्यास असणारा ६ वर्षीय मोनू घरापासून जवळच वरात पाहण्यासाठी गेला. विजेच्या तारांसाठी परिसरात लोखंडाचे पाईप लावण्यात आले होते. मोनू लग्नाची वरात पाहण्यासाठी घरातून निघाला. विजेच्या तारांसाठी लावलेल्या लोखंडी पाईपला मोनूच्या शरीराचा संपर्क झाला. मोनूला शॉक लागला. बराच वेळ तो पाईपला चिटकून राहिल्यानं तो तडफडू लागला. तिथून जात असलेल्या सुषमा नावाच्या महिलेनं मोनूला पाहिलं. पाईपच्या संपर्कात असलेला मुलगा तडफडत असल्याचं पाहून तिनं आक्रोश केला. तिचा आवाज ऐकून अनेकजण घटनास्थळी धावले.
बाबा, आता तरी आम्हाला… दोघांनी लॉजवर जीवन संपवलं; गळ्यात हार, शेजारी कुंकवाचा करंडा
स्थानिकांनी कसेबसे मोनूला लोखंडी खांबापासून दूर नेले. घटनेची माहिती मोनूच्या कुटुंबियांना देण्यात आली. सगळे मोनूला घेऊन रुग्णालयात पोहोचले. डॉक्टर मोनूला वाचवतील अशी आशा होती. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याच्या आईनं हंबरडा फोडला. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मोनूचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद जिल्ह्यातील आहे. अनेक वर्षांपासून ते पानीपतपासून वास्तव्यास आहे.

लोखंडी खांबाला चिकटलेल्या अवस्थेत मोनूला सर्वप्रथम सुषमा नावाच्या महिलेनं पाहिलं. सुषमा काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. विजेच्या तारा लावण्यात आलेल्या लोखंडी खांबाला चिमुकला चिकटल्याचं त्यांनी पाहिलं. त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर अनेक जण तिथे धावले. मोनूला खांब्यापासून दूर करण्यात येईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
मिशन MGM! कॅम्पसमध्ये फिरणारी, फ्रेशर्सशी मैत्री करणारी ‘ती’ निघाली पोलीसवाली; छडा लावला
दुर्घटनेनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. अशा प्रकारचे अनेक लोखंडी खांबे वसाहतीत आहेत. त्यामुळे शॉक लागण्याचा धोका असतो, असं स्थानिकांनी सांगितलं. वीज विभाग, महापालिकेकडून लक्ष दिलं जात नाही. अनेकांनी लोखंडी खांबे लावले आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही, असं गाऱ्हाणं स्थानिकांनी मांडलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here