मुंबई : नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई दरात मोठी घसरण झाली होती. बुधवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, घाऊक किंमत आधारित महागाई (WPI) ५.८५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे असून तो २१ महिन्यांचा नीचांक आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२१ मध्ये महागाई दर ४.८३ टक्के इतका कमी होता.

उत्पादित उत्पादने, इंधन आणि खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्याने नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई ५.८५ टक्के राहिली आहे. ऑक्टोबरमध्ये महागाई ८.३९ टक्के, सप्टेंबरमध्ये १०.७० टक्के, ऑगस्टमध्ये १२.४१ टक्के आणि जुलैमध्ये १३.९३ टक्के होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये महागाईचा आकडा १४.८७ टक्के होता.

Retail Inflation Eases: आनंदाची बातमी! किरकोळ महागाई ९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
अन्नधान्य महागाई घटली
नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाईमधील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे अन्नधान्याच्या भावातील घट. या महिन्यात अन्नधान्य महागाई २२ महिन्यांच्या नीचांकांवर म्हणजे २.१७ टक्क्यांवर आली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये अन्न महागाई दर ६.४८ टक्के होता. दुसरीकडे,अन्न निर्देशांक १.८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनांची महागाईही ४.४२ टक्क्यांवरून ३.५९ टक्क्यांवर आली आहे. इंधन आणि उर्जा महागाई देखील ऑक्टोबरमधील २३.१७ टक्क्यांवरून नोव्हेंबरमध्ये १७.३५ टक्क्यांवर आली आहे.

महागाई कशामुळे? केंद्र नाही सांगणार! रिझर्व्ह बँकेचा अहवाल उघड करण्यास नकार
महागाईची आकडेवारी
– भाज्यांची महागाई १७.६१ टक्क्यांवरून २०.१ टक्क्यांवर
– बटाट्याची महागाई १३.७५ टक्क्यांवरून ४९.७९ टक्क्यांवर
– अंडी, मांस आणि मासे महागाई २.२७ वरून ३.६३ टक्क्यांपर्यंत
– कांद्याची महागाई १९.२ वरून -३०.०२ टक्क्यांवर
– इंधन आणि उर्जा निर्देशांक, ज्यात एलपीजी, पेट्रोलियम आणि डिझेल सारख्या वस्तूंचा समावेश आहे. ही महागाई २३.१७ वरून १७.३५ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.

दिलासादायक बातमी! जगातील वाढत्या महागाईला ब्रेक लागणार, माजी RBI गव्हर्नरने सांगितले

किरकोळ महागाई ११ महिन्यांच्या नीचांकावर
नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई (CPI) ५.८८ टक्क्यांवर आली आहे. ही ११ महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. डिसेंबर २०२१ मध्ये महागाई ५.५९ टक्के होती. तेव्हापासून माहागाई सतत ६ टक्क्यांच्या वर होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये किरकोळ महागाई ६.७७ टक्के होती. तर सप्टेंबरमध्ये हा दर ७.४१ टक्के होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here