वंदना आणि अभिषेक यांनी सीतापूर रोड परिसरात गौर नावानं रुग्णालय सुरू केलं. त्यात दोघे प्रॅक्टिस करायचे. हळूहळू दोघांमध्ये वाद सुरू झाला. दरम्यान वंदना यांनी चहमलपूरच्या लक्ष्मी नारायण रुग्णालयात प्रॅक्टिस सुरू केली. अभिषेक वंदनाला मारहाण करायचा. २६ नोव्हेंबरला अभिषेक आणि त्याचे वडील गौरी शंकर अवस्थी यांनी वंदना यांना घरात दांड्यानं मारहाण केली. मारहाणीत वंदना यांचा मृत्यू झाला.
दोघांनी वंदना यांचा मृतदेह खोक्यात बंद केला. रात्री उशिरा रेल्वे स्थानकातून एक पिकअप भाड्यानं घेतली. त्यात वंदना यांचा मृतदेह ठेऊन स्वत:चं गौरी रुग्णालय गाठलं. रात्रभर मृतदेह रुग्णालयात ठेवला. सकाळी एक रुग्णवाहिका भाड्यानं घेतली. रुग्णवाहिकेनं ३२१ किलोमीटर अंतर कापून गढमुक्तेश्वर गाठलं. तिथे १३०० रुपयांची पावती फाडून अंत्यसंस्कार केले.
तुमची मुलगी कुठेतरी निघून गेली असल्याचं आरोपी डॉक्टरनं वंदना यांच्या वडिलांना सांगितलं. वडील लखीमपूरला आणि त्यांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांची रवानगी तुरुंगात केली आहे.