कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यामधील मुधोल शहरात एका मुलानं वडिलांची हत्या केली. मुलानं वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करून १०० फूट खोल असलेल्या कूपनलिकेत टाकले. मुलानं वडिलांच्या मृतदेहाचे वीसपेक्षा अधिक तुकडे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. यापैकी ८ तुकडे पोलिसांना सापडले आहेत.

वडील परशुराम यांना दारुचं व्यसन होतं. ते दररोज मारहाण करायचे, अशी माहिती विट्टालानं पोलिसांना चौकशीदरम्यान दिली. ६ डिसेंबरला वडिलांनी हल्ला केला. त्यावेळी आपण स्वसंरक्षणार्थ वडिलांवर लोखंडी दांड्यानं हल्ला केल्याचं विट्टालानं पोलिसांनी सांगितलं. परशुराम यांच्या डोक्याला इजा झाली. त्यांनी जागीच जीव सोडल्याची माहिती त्यानं दिली.
गुन्हा उघडकीस येऊ नये यासाठी मृतदेहाचे तुकडे केल्याचं विट्टलानं पोलिसांना सांगितलं. परशुराम अचानक बेपत्ता झाल्यानं स्थानिकांना संशय आला. त्यांनी सोमवारी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी विट्टलाची चौकशी केली. त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करून कूपनलिकेत टाकलेले मृतदेहाचे तुकडे बाहेर काढले. पोलिसांना आतापर्यंत ८ तुकडे सापडले आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.