आम्ही एक किंकाळी ऐकली आणि लगेच दीपेशच्या घराच्या दिशेनं धाव घेतल्याचं शेजारी राहणाऱ्या बिस्वजीत दास यांनी सांगितलं. दीपेशनं आत्महत्येआधी साडी, पेटिकोट, महिलांची अंतर्वस्त्र परिधान केली होती. त्यानं बांगड्या घातल्या होत्या. टिकली लावली होती. ‘मी त्याला लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे. त्याला कधीच महिलांशी संबंधित वस्तूंमध्ये रस नव्हता. दीपेश एक सभ्य मुलगा होता. त्याला दारू किंवा इतर कसलंच व्यसन नव्हतं,’ असं दास म्हणाले.
दीपेशचा स्वभाव चांगला होता. मात्र त्याला अभ्यासात फारसं रस नव्हता, असं कुटुंबातील काहींनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच आशीघर चौकीचे पोलीस घरी पोहोचले. मृतदेह उत्तर बंगालच्या वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दीपेशच्या मोठ्या भावाचा काही महिन्यांपूर्वी अकाली मृत्यू झाल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Home Maharashtra boy commits suicide, कपाळी कुंकू, हाती बांगड्या, साडीही नेसली; दहावीतील मुलाने जीवन...
boy commits suicide, कपाळी कुंकू, हाती बांगड्या, साडीही नेसली; दहावीतील मुलाने जीवन संपवले, शेजारी हादरले – teenage boy ends life at house wearing saree bindi bangles at west bengal
कोलकाता: पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलानं आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी त्यानं साडी नेसली, पेटीकोट परिधान केला. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यानं टिकली लावली, हातात बांगड्या घातल्या. सोमवारी (१२ डिसेंबर) ही घटना घडली. मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला. प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू केला आहे.