मुंबई : जुईनगर येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने आज सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ही यंत्रणा दुरुस्त करण्यात आली. मात्र लोकल वाहतूक उशिराने सुरू असल्याने सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास जुईनगर येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. तर सीएसटी ते वाशी आणि ठाणे ते नेरूळ मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यानंतर साधारण ७ वाजताच्या सुमारास सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं. मात्र आधी लोकल वाहतूक ठप्प झाल्याने अजूनही हार्बर मार्गावरील वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे.

वांद्रे स्थानकाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगराशी जोडणार

दरम्यान, या बिघाडाचा परिणाम मध्य मार्गावरील वाहतुकीवरही झाला. मध्य मार्गावरील लोकल गाड्याही १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. काही वेळानंतर वाहतूक पूर्वपदावर येईल, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here