गांधीनगर: गुजरातमधील सूरत पोलिसांनी एका खुनाचा उलगडा केला आहे. तरुणीची हत्या तिच्याच प्रियकरानं केल्याची माहिती पोलिसांनी दिली. चाकूनं ४९ वेळा भोसकून प्रियकरानं प्रेयसीला संपवलं. एका टी-शर्टमुळे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. सूरतच्या अमरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ नोव्हेंबरला ही घटना घडली होती.

अमरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंजनी औद्योगिक परिसरात असलेल्या शेतात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. शरीरावर चाकूचे वार झाल्याच्या खुणा होत्या. तरुणीच्या मृतदेहावर ४९ वार करण्यात आले होते. या घटनेचा तपास सूरत पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू होता.
भयंकर! मुलानं वडिलांना निर्घृणपणे संपवलं, तुकडे १०० फूट खाली; पोलिसांना पोकलेन आणावी लागली
सूरत शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त शरद सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची माहिती मिळवण्यासाठी परिसरात चौकशी करण्यात आली. मात्र फारशी माहिती मिळाली नाही. बस आगार, रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यत आले. तरुणीनं परिधान केलेल्या टी-शर्टच्या आधारे तरुणीचा शोध घेण्यात आला. मृत तरुणी ओदिशाच्या भुवनेश्वरची असून तिचं नाव कुनीदास सीमादास होतं.

पोलिसांनी कुनीदासची अधिक माहिती मिळवण्यास सुरुवात केली. भुवनेश्वरमध्येच वास्तव्यास असलेल्या जगन्नाथ गौडा नावाच्या तरुणाशी कुनीदासचे प्रेमसंबंध होते. कुनीला त्याच्याशी लग्न करायचं होतं. तिनं अनेकदा लग्नासाठी तगादा लावला. मात्र जगन्नाथला तिच्याशी लग्न करण्यात रस नव्हता. त्यामुळे त्यानं तिची हत्या केल्याची माहिती तपासातून उघडकीस आली.
डॉक्टर पत्नीला संपवलं; ऍब्युलन्समधून ३२१ किमी अंतर कापलं; १३०० रुपयांची पावती फाडली अन्…
जगन्नाथ कुनीदासला सूरतला घेऊन आला. जगन्नाथवर आंधळा विश्वास ठेऊन कुनीदास कुटुंबाला सोडून ट्रेननं सूरतला आली. सूरत फिरण्याच्या बहाण्यानं आरोपी कुनीदासला घटनास्थळी घेऊन आला. निर्जन शेतात नेऊन आरोपीनं कुनीदासची चाकूनं भोसकून हत्या केली. त्यानं तिच्यावर ४९ वार केले. कुनीचा श्वास थांबल्याचं लक्षात आल्यावरच तो थांबला. त्यानंतर भुवनेश्वरला परतला. तिथे जाऊन स्वत:चं काम करू लागला. पोलिसांनी जगन्नाथला अटक केली आहे. त्याच्याविरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here