मुंबईः राज्यात करोनाबाधितांची संख्या तीन लाखांवर येऊन ठेपली असली तरी करोनाग्रस्त रुग्ण बरे होणांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. आज तब्बल सात हजार १८८ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात करुन घरी सुखरुप परतले आहे. असं, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ()

राज्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्यानं काहीसा समाधान मिळतं आहे. आज राज्यातील विविध रुग्णालयांतून ७ हजार १८८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, आत्तापर्यंत एकूण १ लाख ८२ हजार २१६ करोनाबाधित रुग्ण सुखरुप घरी परतले आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५. ७२ टक्के इतके झाले आहे. विविध रुग्णालयात सध्या १ लाख ३२ हजार २३६ अॅक्टिव्ह रुग्ण असून उपचार घेत आहेत. सध्या राज्यात ७ लाख ७९ हजार ६७६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून ४५ हजार ०७७ व्यक्ती संस्थांत्मक क्वारंटाइनमध्ये आहे.

वाचाः

राज्यात करोना रुग्ण बरे होण्याची आकडा दिलासादायक असला तरी करोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ कमी होताना दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानं आरोग्य प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आज तब्बल ८ हजार ३६९ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. तर, आज २४६ करोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्याचा मृत्यूदर ३.७५ टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या ३ लाख २७ हजार ०३१ करोनाबाधित रुग्ण आहेत. तर, आत्तापर्यंत १२ हजार २७६ जणांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १६ लाख ४० हजार ६४४ चाचण्यांपैकी ३ लाख २७ हजार ०३१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात नोंद झालेले २४६ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-३, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-६, कल्याण-डोंबिवली मनपा-३, उल्हासनगर मनपा-५ भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-४, रायगड-४,पनवेल-२, नाशिक-२, नाशिक मनपा-४, मालेगाव मनपा-१, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, धुळे-१, जळगाव-४, जळगाव मनपा-२, नंदूरबार-२, पुणे-१, पुणे मनपा-४०, पिंपरी-चिंचवड मनपा-१५,सोलापूर-६, सोलापूर मनपा-४, सातारा-८, कोल्हापूर-१, कोल्हापूर मनपा-२, सांगली-२, औरंगाबाद-५, औरंगाबाद मनपा-१२, जालना-१, परभणी-२, परभणी मनपा-१, लातूर-३, लातूर मनपा-३, उस्मानाबाद-३, नांदेड-२, अकोला-१, अमरावती-१, यवतमाळ-३, वाशिम-२, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य ३ अशी नोंद आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here