सिडनी: जरा कल्पना करा तुम्ही तुमचा मोबाईल फोन तपासल्यावर तुमच्या बँक खात्यात अचानक करोडो रुपये जमा झाल्याचा मेसेज दिसला तेव्हा तुम्हाला कसे वाटेल? नक्कीच तुम्हाला पहिले थोडं आश्चर्य वाटेल, आणि तुम्ही विचार कराल की हे पैसे आले कुठून? आणि आता तुमच्या हृदयावर हात ठेवा आणि सांगा की तुम्ही त्या पैशाची माहिती तुमच्या बँकेला द्याल की लॉटरीचे बक्षीस समजून पैसे खर्च कराल? जर तुम्ही ते पैसे खर्च करण्याचा विचार करत असाल, तर सिडनीतील प्रसिद्ध रॅपर अब्देल घडियाने केलेली चूक करू नका.

तरुणाच्या खात्यात अचानक ३०० कोटी आले पण गर्लफ्रेंड भडकली, भांडण थेट सोशल मीडियावर
रॅपरच्या खात्यात ६ कोटी
अब्देलने तीच चूक केली, जी आपल्यापैकी बहुतेकजण करतात. अचानक त्याच्या खात्यात ७६०,००० डॉलर जमा झाले. एक जोडपं घर खरेदीसाठी पैसे ट्रान्सफर करत होते, मात्र चुकून अब्देलच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले. आणि कोणालाही न सांगता अब्देलने ६ कोटीपैकी ५.८ कोटी रुपये खर्च केले. त्याने ५ कोटींचे सोने खरेदी केले तर खात्यातील उरलेले पैसे काढले आणि ब्रँडेड कपडे, बिटकॉइन्स, फॅशन वस्तू खरेदी केले. अशा प्रकारे बँकेला न कळवता अब्देलने खात्यात चुकून आलेले पैसे खर्च केले. आणि त्याला या चुकीची शिक्षाही मिळाली असून न्यायालयाने त्याला १८ महिन्यांची शिक्षा सुनावली.

अचानक बँक खात्यात आले १३-१३ कोटी; HDFCचे १०० ग्राहक क्षणात मालामाल
पण हे काही पहिले प्रकरण नाही. यापूर्वी अमेरिकेतही अशाच पद्धतीने मुलीच्या खात्यात १८ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. मुलीने क्षणाचाही विलंब न करता ते पैसे शॉपिंग करत खर्च केले. काहीवेळा बँकांच्या तांत्रिक अडचणींमुळे काही काळासाठी अज्ञात रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित केला जातो. आणि लोक विलंब न करता हा पैसा खर्च करतात, त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका.

महिलेच्या बँक खात्यात अचानक जमा झाले ५७ कोटी; आलिशान घर घेतले आणि मग जे झाले…
खात्यात अचानक पैसे आल्यास काय करावे?
कधी तांत्रिक बिघाड तर कधी चुकून दुसऱ्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. असे काही तुमच्या सोबत घडल्यास तुम्ही याची माहिती ताबडतोब बँकेला द्यावी. बँकेत येणाऱ्या अनोळखी रकमेची माहिती बँकेला दिल्यानंतर तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करता. बँक ते पैसे त्याच्या मालकापर्यंत पोहोचवते. जर तुम्ही ते पैसे काढून खर्च केले तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात.

तुम्ही चुकून खात्यात आलेले पैसे खर्च केल्यास बँक पहिले तुम्हाला ते परत करण्यास सांगते. मात्र, असे न केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले तर प्रथम बँकेला त्याची माहिती देणे आवश्यक आहे. ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत, त्याच बँकेत तुमचे खाते असले, तर तुमचे आणि बँकेचे काम सोपे होईल. ज्या व्यक्तीच्या खात्यात निधी हस्तांतरित केला गेला आहे, त्या व्यक्तीला फोन करून बँक या चुकीच्या व्यवहाराची माहिती देईल. आणि त्या व्यक्तीला निधी परत करण्याचे आवाहन करेल. जर त्या व्यक्तीने सहज पैसे परत केले तर ठीक आहे, अन्यथा बँकेला त्या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा हक्क आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here