वाचा- जागतिक विजेत्याचा झंझावात; मोरक्कोचा २-०ने पराभव करत फ्रान्स सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत
फ्रान्सकडून झालेल्या पराभवानंतर ब्रसेल्समध्ये मोरक्कोचे चाहते पोलिसांशी भिडले. १००हून अधिक चाहते ब्रसेल्स साउथ स्टेशनच्या जवळ आले आणि त्यांनी पोलिसांच्यावर फटाके आणि अन्य गोष्टी फेकल्या. त्यानंतर चाहत्यांनी कचरा आणि अन्य गोष्टींना आग लावली. जमावाला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना अश्रूधुरांचा सामना करावा लागला.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार अनेक चाहत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे सांगत या घटनेत कोणतीही गंभीर गोष्ट झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाचा- कर्णधारपदाचा राजीनामा देत केन विलियमसनने दिला धक्का; हा खेळाडू करणार संघाचे नेतृत्व
मोरक्कोच्या चाहत्यांनी फ्रान्सची राजधानीत देखील धुमाकूळ घातला. संघाच्या पराभवानंतर मोरक्कोचे चाहते फ्रान्सच्या चाहत्यांशी भिडले. फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात मोरक्कोचे नागरिक राहतात. परिस्थिती हाताबाहेर जात होती असे दिसताच पोलिसांनी पाण्याचा वापर केला आणि अश्रूधुर सोडले. करातमध्ये झालेल्या सामन्यानंतर फ्रान्समध्ये हा प्रकार सुरू झाल. त्यामुळे देशातील अनेक शहरात पोलिस छावणीचे स्वरुप आले होते.
गृहमंत्र्यांना समोर यावे लागले
देशात सुरू झालेल्या या राड्यामुळे अखेर फ्रान्सच्या गृहमंत्र्यांना समोर यावे लागले. त्यांनी एक निवेदन जाहीर केले. फ्रान्सच्या चाहत्यांप्रमाणे मोरक्कोचे चाहते देखील आमचे लोक आहेत. विजयाचा आनंद साजरा करण्याचा आणि पराभवाचे दुख: व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कायदा हातात घेऊ नये.
असे आहेत मोरक्कोचे चाहते
मोरक्कोने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला आफ्रिकी देश ठरला. याआधी त्यांनी १० डिसेंबर रोजी पोर्तुगालचा पराभव केला होता. तेव्हा देखील चाहत्यांनी पॅरिसमध्ये धुमाकूळ घातला होता.