पती जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फिजिओ असलेल्या पत्नीनं केला आहे. पतीनं घरात साप सोडले. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, अशा स्वरुपाची तक्रार तिनं पोलिसात दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

डॉ. संजय आता अलाहाबादमध्ये वास्तव्यास आहेत. आपला काटा काढण्यासाठी संजय यांनी अनेकदा प्रयत्न केल्याचा आरोप सविता यांनी केला. हत्या नैसर्गिक असल्याचं दाखवण्यासाठी माझ्या खोलीत साप सोडण्यात आले. एकदा ऍसिड हल्लादेखील केला. या प्रकरणी पल्लवपुरम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र कारवाई झाली नसल्याचं सविता म्हणाल्या.
संजय यांच्याकडून घटस्फोट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र माझ्या जीवाला धोका आहे. जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला पती संजय जबाबदार असतील, असं सविता यांनी तक्रार पत्रात म्हटलं आहे. या प्रकरणात सविता यांची तक्रार मिळाली असून पुढील कारवाई सुरू असल्याचं सर्कल ऑफिसर अभिषेक पटेल यांनी सांगितलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.