वॉशिंग्टन: पृथ्वीवर हवा किंवा एखादे वादळ ही अगदीच सामान्य गोष्ट ठरते. पण पृथ्वीच्या बाहेर अशी काही घटना झाली तर त्याबाबत मोठी चर्चा झाली नाही तरच नवल म्हणावे लागले. पृथ्वीनंतर अन्य कोणत्या गृहावर राहता येईल यासाठीचा सर्वात जवळचा ग्रह म्हणजे मंगळ होय. गेल्या काही वर्षात विविध अंतराळ संशोधन संस्थांनी मंगळाचा अभ्यास सुरू केला आहे. यात अमेरिकेची अंतराळ संस्था नासा ही सर्वात आघाडीवर आहे. नासाला आता एक मोठी माहिती हाती आली आहे.

मंगळ ग्रहावर देखील हवा आणि वादळ तयार होतात, हे याआधीच्या संशोधनात समोर आले होते. आता नासाला या वादळाचा आणि हवेचा आवाज कसा असतो हे कळाले आहे. नासाच्या पर्सीवरेंन्स रोव्हरने या लाल ग्रहावरील एका वादळाचा आवाज रेकॉर्ड केला आहे. धुळीचे हे छोटे वादळ रोव्हरवरून गेले. जेव्हापासून हे रोव्हर मंगळावर आहे तेव्हापासून प्रथमच अशा प्रकारचा एखादा आवाज रेकॉर्ड करण्यात आला आहे. रोव्हरने १० सेकंदाचा धुळीच्या कणांचा आवाज रेकॉर्ड करून तो पृथ्वीवर पाठवला.

वाचा- अर्जुनच्या शतकानंतर प्रशिक्षक योगराज यांची पहिली प्रतिक्रिया; लिहून ठेव एक दिवस…

नासाने दिलेल्या माहितीनुसार मंगळावर रेकॉर्ड करण्यात आलेल्या धुळीच्या वादळाचा आवाज पृथ्वीवर जसा असतो तसाच आहे. अर्थात मंगळावर वातावरण शांत असल्याने आवाज हलका येतो. नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशीत झालेल्या संशोधनात लेखक नाओमी मर्डोक लिहितात, हे धुळीचे वादळ गेल्या वर्षी रोव्हरवरून वेगाने गेले होते. तेव्हा रोव्हरमधील कॅमेऱ्याने त्याचे फोटो काढले आणि अन्य डेटा गोळा केला.

वाचा- कर्णधारपदाचा राजीनामा देत केन विलियमसनने दिला धक्का; हा खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

नासा म्हणाले नशीब चांगले

नासाकडून मंगळ ग्रहाचे फोटो अनेक वर्षापासून काढले जात आहेत. पण या ग्रहावर आजवर कधीच कोणताही आवाज ऐकू आला नाही. लाल ग्रहावर अशा प्रकारचे चक्रीवादळ हे सामान्य गोष्ट आहे. ज्या वादळाचा आवाज रेकॉर्ड झाला आहे तो किमान ४०० फुट लांब आणि ८० फुट उंच होता. त्याचा वेग १६ फुट प्रति सेकंद इतका होता. या वादळाचा आवाज रेकॉर्ड करणे ही एक नशीबाची गोष्ट आहे. आम्हाला माहिती नाही की भविष्यात पुन्हा असे कधी होईल. यासाठी पर्सीवरेंन्स रोव्हरकडून नियमीत प्रयत्न सुरू असतात.

वाचा- जागतिक विजेत्याचा झंझावात; मोरक्कोचा २-०ने पराभव करत फ्रान्स सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत

एका वर्षापूर्वी ऐकू होता आवाज

मर्डोकने सांगितले की, रोव्हरवर असलेल्या सुपरकॅमवर असलेला माइक प्रत्येक दिवशी ३ मिनिटासाठी सुरू होतो. त्यामुळे हे रेकॉर्डिंग नशिबाने झाले असे म्हणावे लागले. २७ डिसेंबर २०२१ रोजी हे वादळ दिसले. मर्डोक यांच्या मते २०० पैकी १ वेळा अशा प्रकारचा आवाज नोंदवला जाऊ शकतो. या रोव्हरने सर्वात आधी फेब्रुवारी महिन्यात लँड झाल्यानंतर मंगळावर पहिला आवाज रेकॉर्ड केला होता. तो आवाज मंगळावरील हवेचा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here