नागपूर: मध्ये विषाणूची साखळी खंडीत होण्याऐवजी चिंताजनक स्थिती वाढत चालली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून नागपुरात सुरू असलेला प्रकोप म्हणजे समूह संसर्गाचे संकेत तर नाहीत ना, अशी नवी धास्ती नागपूरकरांच्या मनात घर करत आहे. त्यात आज नागपुरात आणखी १४४ बाधितांची भर पडली तर या आजाराची लागण झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत बाधित संख्या ३१७१ वर तर मृत्यू संख्या ५८ अशी झाली आहे. ( )

वाचा:

नव्याने करोनाची बाधा झाल्याचे निदान झालेल्यांमध्ये आज खासगी प्रयोगशाळांनी धक्का दिला. खासगीत आज जवळजवळ ४९ जणांच्या घशातील स्त्राव नमुन्यांमध्ये करोनाचा विषाणू सापडला. त्या नंतर ३५ नमुन्यांचा अहवाल एम्समधून, निरीतून २९, मेयोतून २६, मेडिकलमधून २ तर मधून तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मेयोत मृत्यूची नोंद झालेला करोना बाधित ४५ वर्षीय व्यक्ती कन्हानचा रहिवासी असून त्याला दगावलेल्या अवस्थेत नातेवाईकांनी मेयोत आणले होते. प्रशासनाने घशातील स्त्राव नमुना तपासला असता आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर मेडिकलमध्येही एका व्यक्तीच्या मृत्यूची सोमवारी नोंद झाली. त्यामुळे शहरातील आजपर्यंत दगावलेल्या एकूण बाधितांची संख्या थेट ५८ वर पोहचली आहे.

वाचा:

शहरात सध्या उपचार सुरू असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या १,१३२ अशी आहे. पैकी २२९ रुग्ण मेयोत, २४९ रुग्ण मेडिकलमध्ये, ५० रुग्ण एम्समध्ये, २२ रुग्ण कामठीत, २८ रुग्ण खासगी रुग्णालयात, ३२७ रुग्ण आमदार निवासातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये, १२४ रुग्ण मध्यवर्ती कारागृहातील मध्ये उपचार घेत आहेत. तर १०३ रुग्णांवर रात्री उशिरा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

करोनामुक्त संख्या दोन हजारांच्या उंबरठ्यावर

काहीसा दिलासा देणारी बाब म्हणजे करोनामुक्त संख्या दोन हजारांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आज दिवसभरात ४२ करोना बाधित उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत करोना मुक्त झालेल्यांची संख्याही १९८१ पर्यंत पोचली आहे. करोना मुक्तीचा हा दर कालच्या तुलनेत सव्वा ते दीड टक्क्यांनी घसरत ६२. ४७ वर असा झाला आहे.

वाचा:

करोना संसर्गाची सद्यस्थिती

दैनिक करोना सदृष्य लक्षणे असलेले रुग्ण- २२४
एकूण करोना सदृष्य लक्षणे असलेले रुग्ण – ३१३२
आजचे करोना पॉझिटिव्ह रुग्ण- १४४
दैनिक करोनामुक्त- ४२
आतापर्यंत करोनामुक्त- १९८१
करोना एक्टिव्ह रुग्ण- ११३२
दैनिक तपासणी नमुने- १७६०
आतापर्यंत तपासलेले नमुने- ५१२८७

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here