शेअर्समध्ये तेजीचे कारण काय?
भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलला मदत करण्यासाठी सरकारने एक लाख ६४ हजार कोटी रुपयांचे मोठे पॅकेज मंजूर केले आहे. बुधवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या पॅकेजमुळे संचार निगमचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जाईल. वैष्णव यांनी सांगितले की बीएसएनएल स्वदेशी विकसित ४जी आणि ५जी तंत्रज्ञान लागू करणार आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया उपक्रमाच्या अनुषंगाने भारतातील अभियंत्यांनी ४जी आणि ५जी तंत्रज्ञान विकसित केले, जी अभिमानाची बाब आहे. यासोबतच सरकार एमटीएनएललाही प्रोत्साहन देणार आहे. लक्षात घ्यायचे की बीएसएनएल-एमटीएनएलच्या विलीनीकरणाला आधीच मान्यता देण्यात आली आहे.
पैसे कमावण्याची सुवर्ण संधी, या बँकेचे शेअर्स गेल्या २ वर्षांच्या उच्चांकावर!
बीएसएनएल-एमटीएनएलला स्थापनेपासून हजार कोटी रुपयांचा तोटा
सरकारी मालकीच्या दूरसंचार ऑपरेटर, बीएसएनएलने स्थापनेपासून ५७,६७१ कोटी रुपयांचे नुकसान नोंदवले आहे, तर एमटीएनएलला मार्च २०२२ पर्यंत सुमारे १४,९८९ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. सरकारच्या माहितीनुसार, कर्मचारी खर्च, बाजारातील स्पर्धा आणि कर्जाचा बोजा ही तोट्याची महत्त्वाचे कारणे आहेत.
गुंतवणुकीची मोठी संधी! दोन दशकनंतर टाटा समूहाचा IPO बाजारात येणार
त्यामुळे, तोट्यात चाललेल्या या कंपन्यांचा पुनरुज्जीवन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २०१९ मध्ये बीएसएनएल आणि एमटीएनएलसाठी एक पुनरुज्जीवन योजना मंजूर केली ज्यामध्ये VRS, गॅरंटी बॉण्ड्स, प्रशासकीय कर्ज पुनर्गठन द्वारे कर्मचारी खर्च कपातीचा समावेश आहे. कॅपिटल इन्फ्युजनद्वारे ४जी सेवांसाठी स्पेक्ट्रमचे वाटप, कोर आणि नॉन-कोअर मालमत्तेचे मुद्रीकरण आणि बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विलीनीकरणासाठी तत्वतः मान्यता यांचाही समावेश आहे.