पुणे : पुण्यात गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये. हडपसरमध्ये मित्राची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता हडपसर परिसरातूनच एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना हडपसर येथील फुरसुंगी भागात घडली आहे.

याबाबत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी रात्री हरपळे वस्तीत घडली आहे. फिर्यादीनंतर या प्रकरणी आशिष मारुती दणके (वय २४, रा. हरफळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाह समन्वय समितीवरून हुसेन दलवाईंचा सरकारवर मोठा आरोप, कडाडून विरोध करत म्हणाले…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि आरोपी आशिष दणके हे परस्परांना ओळखतात. आशिष हा मुलीचा पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घालत असे. दणके हा विवाहित आहे. हा प्रकार पीडितेने आशिष दणके याच्या पत्नीला देखील सांगितला. यामुळे आशिष चिडला होता.

पीडित मुलगी फुरसुंगी भागातून निघाली होती. आशिषने तिला धक्का दिला. आज तुला मारुन टाकतो, अशी धमकी देऊन त्याने पीडितेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. प्रसंगावधान राखून पीडित मुलीने वार हुकवला. पीडित मुलीसोबत बरोबर असलेल्या मैत्रिणीला मारहाण करुन आशिष पसार झाला. हत्येचा प्रयत्न आणि विनयभंग केल्याप्रकरणी आशिषच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक डमरे संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

डुक्कर विष्णूचा अवतार, त्याचा दात पाण्यात ठेवून मुलींना पाजा, कालीचरण महाराजांचा अजब सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here