कोल्हापूरमधील राजारामपुरी येथे असलेल्या बिर्याणी बाय किलो या बिर्याणी हॉटेलमध्ये लावण्यात एका फोटोमुळे वाद निर्माण झाला आहे. बहादूर शाह जफरचा फोटो लावण्याने संतापलेल्या कोल्हापूरकरांनी हॉटेलमध्ये घुसून हा फोटो रस्त्यावर आणून फाडला आहे. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असून यावेळी हॉटेलमधील कर्मचारी आणि तरुणांमध्ये मोठी वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, काल दिवसभर कोल्हापूरात हॉटेलमध्ये लावण्यात आलेला फोटो संदर्भात असल्याचा मॅसेज व्हायरल झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी हॉटेलमध्ये घुसून सदर फोटो काढत तोडफोड केली तसेच हॉटेल चालकास मारहाण देखील केली असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, संबधित फोटो बहादूर शाह जफरचा होता आणि तो उर्दू कवी देखील होता, अशी माहिती आता मिळाली आहे. बिर्याणी बाय किलो हे फ्रॅंचाईजी सिस्टीम हॉटेल असून या फ्रॅंचाईजीचे अनेक शहरांमध्ये आउटलेट्स आहेत. शिवाय यांच्या बिर्याणीला मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. हैदराबादी स्वरूपात बिर्याणी असल्याने ग्राहकांना जुन्या काळातील अनुभव मिळावा यासाठी हॉटेलचे इंटेरियर मुघल काळातील संत,कवी इत्यादींच्या फोटोंचा वापर करण्यात आला होता. मात्र एका कवीचा फोटो औरंगजेबाचा असल्याचा मेसेज व्हायरल झाल्यानं हा सर्व प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान हॉटेलच्या लोकांनी अद्यापही यासंदर्भात कोणतीही तक्रार पोलिसात नोंदवलेली नाही.
कोल्हापूरमधील या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर मधील कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
डुक्कर विष्णूचा अवतार, त्याचा दात पाण्यात ठेवून मुलींना पाजा, कालीचरण महाराजांचा अजब सल्ला
Hi esy.es Webmaster, same in this article: Link Text
Hello esy.es Owner, exact same in this article: Link Text