अमरावती मटा प्रतिनिधी: ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या युवतीला शादी डॉट कॉमच्या माध्यमातून विवाहाचे आश्वासन देऊन अडीच लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भेटवस्तू देण्याच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली आहे. फसगत झालेली युवती ही अमरावतीच्या ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. ()

वाचाः

एक महिन्यांपूर्वीच तिने शादी डॉट कॉमवर स्वत:ची प्रोफाईल तयार केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीची तिची उमेश देशमुख नामक एका युवकाशी ओळख झाली. उमेश यानं युवतीला आपण स्कॉटलँड येथं राहत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्रीदेखील झाली होती. त्यामुळं युवतीनं उमेशवर विश्वास ठेऊन आपला मोबाइल क्रमांकही दिला होता. याच काळात उमेशनं व्हॉट्सअपच्या माध्यमातून तिच्याशी जवळीक वाढवली.

पोलीस कर्मचारी युवतीसाठी भेटवस्तू घेतली आहे, ती भारतामध्ये पाठवित असल्याचे त्याने सांगितले. यासाठी सदर युवतीचा ई-मेल आयडी, पत्ता मागण्यात आला. फसगत झालेल्या युवतीने ही माहीती पाठविली. ५० हजाराची भेटवस्तू पाठविण्यात येत असून ट्रेडिंग लिंकवर तपासण्याची विनंती उमेशनं केली. सदर युवतीने तपास केला असता भेटवस्तू आल्याचे तिला समजले. ७ जुलै रोजी दिल्ली येथील कुरियर कंपनीत कार्यरत महिलेने फोन करून युवतीला स्कॉटलॅन्ड येथून भेटवस्तू आल्याचे सांगितले. सदर भेटवस्तू सोडविण्यासाठी तिला अभिलाषा, युनूस शेख, चतुरा धायरे अशा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या बँक खात्यात २ लाख ४८ हजार रूपये पाठविण्याचे सांगितले. परंतु कोणतीच भेटवस्तू आली नसून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलीसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम ४१९, ४२०, सहसकलम ६६(सी)६६ (ड) माहीती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here