जळगाव : जळगावमध्ये एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने कापसाचा भरलेला ट्रक रस्ता लगत उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत ट्रकमधील एक तरुण जागीच ठार झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जळगाव तालुक्यातील ममुराबाद विदगाव रस्त्यावर हा अपघात झाला जखमींना जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. राज रवींद्र अहिरे (वय-२०, रा. मुंगटी ता. जि. धुळे) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

धुळे जिल्ह्यातील मुंगटी येथील ट्रक क्रमांक (एम.एच १८ एए १०८०) हा ट्रक मजुरांसह यावल येथील डांभुर्णी येथे कापूस भरण्यासाठी गेला होता. त्यानंतर गुरुवारी १५ डिसेंबरला सकाळी ट्रकमध्ये कापूस भरून परत मुंगटी येथे जाण्यासाठी निघाला होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ममुराबाद ते वीदगाव रस्त्यावरील फार्मसी कॉलेजजवळून जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने ट्रकला कट मारला.

मोठी बातमी! राज्यात हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक, ११ क्षेत्रांत गुंतवणूक करणार
यात ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात राज रवींद्र अहिरे हा तरुण जागीच ठार झाला तर प्रमोद संभाजी पाटील (वय-४०), भरत दगडू पाटील (वय-३२), दिगंबर दिलीप पाटील (वय-३०), रवींद्र बारकू भिल अहिरे (वय-५०), जितेंद्र पवार (वय-३५), निंबा दगडू पाटील (वय-३६) आणि बुधा पाटील (वय-६०) सर्व राहणार मुंगटी ता. जि.धुळे हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले आहे. याप्रसंगी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. या घटनेबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरण: सोमय्या पितापुत्रांना मुंबई पोलिसांची ‘क्लीन चीट’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here