मुंबई: अमेरिका आणि आशियाई शेअर बाजारातील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारात आज लाल चिन्हात व्यवहाराची सुरुवात झाली आहे. बीएसईचा सेन्सेक्स २९४ अंकांच्या घसरणीसह ६२,५०५ अंकांवर उघडला, तर एनएसईचा निफ्टी ८२ अंकांनी घसरून १८,३३२ वर व्यवहारास सुरुवात केली.

बाजारातील पडझडीचे कारण काय
गुरुवारी अमेरिकी बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले. डाऊन जोन्स ७६४ अंक किंवा २.२५ टक्क्यांनी आणि नॅस्डॅक ३६० अंक किंवा ३.२३ टक्क्यांनी घसरून बंद झाला. याशिवाय आशियाई बाजार – निक्केई, तैवान, स्ट्रेट टाइम्स घसरणीसह व्यापार करत आहे.

२५ रुपयाचा स्टॉकची कमाल, कर्जबाजारी कंपनीचे शेअर खरेदीसाठी झुंबड उडाली, पाहा झालं तरी काय
अमेरिकेत मंदीच्या शक्यतेने जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. SGX निफ्टी जवळपास ६० अंकांनी घसरत असून आशिया देखील कमजोर दिसत आहे. गुरुवारी अमेरिकन बाजारात ३ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण झाली आणि बाजार ३% खाली घसरले. डाऊन जोन्स ७६४ अंकांनी घसरून ३३,२०२ वर तर नॅसडॅक ३६० अंकांनी आणि S&P निर्देशांक १०० अंकांनी घसरून बंद झाला.

IPO ठरला सुपर फ्लॉप, आता कंपनी शेअर बायबॅकच्या मूडमध्ये, गुंतवणूकदारांचे नशीब बदलेल!
यूएस मार्केटमध्ये सर्व ११ सेक्टर्स नुकसानीसह बंद झाले. त्याच वेळी बाजारातील ७३% समभाग घसरले. अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीत जाण्याच्या चिंतेने बाजार कोसळले. याशिवाय यूएस फेडच्या विधानांमुळे बाजार अजूनही निराश झाले.

पैसे कमावण्याची सुवर्ण संधी, या बँकेचे शेअर्स गेल्या २ वर्षांच्या उच्चांकावर!
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती
बाजारातील घसरणीमुळे बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एमएफसीजी यांसारख्या क्षेत्रांमध्ये घसरणीसह व्यापार सुरू झाला. मात्र ऊर्जा, मीडिया, रिअल इस्टेट आणि इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तसेच मिडकॅप समभागांमध्ये घसरण होत असून स्मॉलकॅप समभागांमध्ये तेजी दिसून येत आहे. निफ्टीच्या ५० समभागांपैकी २० समभाग तेजीत तर ३० समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. याशिवाय सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी १७ समभाग वाढून आणि १३ समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.

शेअर्सची वाटचाल
दिवसाच्या सुरुवातीला व्यवहारात लार्सन १.२१ टक्के, रिलायन्स ०.८४ टक्के, पॉवर ग्रिड ०.४४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.३८ टक्के, भारती एअरटेल ०.३३ टक्के वाढून व्यवहार करत आहे. त्याच वेळी टीसीएस १.०६ टक्के, इन्फोसिस १.०६ टक्के, एशियन पेंट्स १ टक्के, विप्रो ०.९२ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here