मुंबई: मुंबई शहरातील आणि भागात आज रुग्णसंख्येचा आकडा खाली आला असून ही सर्वांसाठीच दिलासा देणारी बाब आहे. धारावीत आज करोनाचे फक्त १० नवीन रुग्ण आढळले तर दादरमध्ये १४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. ( Coronavirus In )

वाचा:

दाट लोकवस्तीच्या धारावीमधील १५१ बाधित रुग्णांवर सध्या प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. धारावात आतापर्यंत करोनाचे एकूण २ हजार ५०२ रुग्ण आढळले असून त्यातील २ हजार १०१ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. बरे झालेल्या या सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दादरचा विचार केल्यास दादरमध्येही रुग्णसंख्या आता कमी कमी होऊ लागली आहे. दादरमध्ये एकूण १ हजार ४४४ जणांना करोना संसर्गाची लागण झाली असून त्यातील ९३५ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत तर ४३७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. धारावीपेक्षा दादरमध्ये करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण जास्त असल्याने ती एक चिंतेची बाब आहे.

वाचा:

धारावीला लागून असलेल्या माहीममध्येही करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. माहीममध्ये आज फक्त ३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या १ हजार ५१० इतकी झाली आहे. आतापर्यंत यापैकी १ हजार २१० रुग्ण बरे झाले असून २३१ अॅक्टिव्ह रुग्णांवर सध्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

धारावी, दादर, हा भाग मुंबई पालिकेच्या जी उत्तर विभागात येतो. या विभागात आज एकूण २७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यासोबतच विभागातील एकूण रुग्णसंख्या ५ हजार ४५६ इतकी झाली असून त्यातील ४ हजार २४६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार विभागात सध्या ८१९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

वाचा:

धारावीतील जुलै महिन्यातील स्थिती

तारीख-नवीन रुग्ण

१ जुलै- १४
२ जुलै- १९
३ जुलै- ८
४ जुलै- २
५ जुलै- १२
६ जुलै- ११
७ जुलै- १
८ जुलै- ३
९ जुलै- ९
१० जुलै- १२
११ जुलै- ११
१२ जुलै- ५
१३ जुलै- ६
१४ जुलै- ११
१५ जुलै- २३
१६ जुलै- १३
१७ जुलै- १०
१८ जुलै- ६
१९ जुलै- ३६
२० जुलै- १२
२१ जुलै- १०

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here