शेअरचा इतिहास
बीएसईवर उपलब्ध आकडेवारीनुसार टीटीएमएलचे शेअर्स गेल्या अनेक महिन्यांपासून लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. वर्ष २०२२ मध्ये कंपनीचा स्टॉक आतापर्यंत ५५ टक्क्यांनी खाली घसरला असून या दरम्यान शेअर २१६ रुपयांवरून ९८.६० रुपयांवर घसरला आहे. त्याच वेळी, TTML शेअर्स गेल्या सहा महिन्यांत १७.६६ टक्क्यांनी घसरले आहेत. हा शेअर एका वर्षात ४५.२५% घसरला आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि तिचे मार्केट कॅप १९,२९५.१४ कोटी रुपये आहे.
टाटा समूहाच्या या स्टॉककडे गुंतवणूकदारांचे दुर्लक्ष नको
गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षी जानेवारीमध्ये टाटा समूहाच्या या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर ही रक्कम ४५ हजार रुपयांवर घसरली असेल. टाटा समूहाचा हा शेअर सध्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ६५% पेक्षा जास्त तुटला असून शेअरने ११ जानेवारी २०२२ रोजी २९१.०५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. तसेच शेअरचा ५२ आठवड्याचा नीचांक ८८.२० रुपये आहे.
गुंतवणुकीची मोठी संधी! दोन दशकनंतर टाटा समूहाचा IPO बाजारात येणार
कंपनीचा व्यवसाय काय?
TTML ही टाटा टेलिसर्व्हिसेसची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या व्यवसायात मार्केट लीडर असून कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. बाजारातील तज्ज्ञांनुसार गेल्या महिन्यात कंपनीने कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा सुरू केली, तर कंपन्यांना क्लाउड आधारित सुरक्षा सेवा आणि वेगवान इंटरनेटसह ऑप्टिमाइझ्ड नियंत्रण मिळत असल्याने याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.