मात्र, तृर्तीयपंथाचे प्रमाणपत्र नसल्याने फॉर्म भरण्याचे टाळले जात होते. फॉर्म भरण्याची जिद्द असल्याने या प्रमाणपत्रासाठी शेवटचा दिवस असल्याने तृर्तीयपंथीयांवर काम करणार्या कमल फाउंडेशनने त्याला फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या सर्वच कागदपत्रांची पूर्तता केली. अखेर शेवटच्या दिवशी सायंकाळी त्याचा पोलीस भरतीसाठी फॉर्म भरून घेतला. हा मराठवाड्यातील पहिल्याच तुर्थीयपंथीयाचा पोलीस भरतीचा अर्ज असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं.
दिनेश हाणवते याचे शिक्षण
दिनेश हा उच्चशिक्षित असून त्याचे समाजशास्त्र या विषयात (M.A.) झाले आहे. मागील अनेक महिन्यांपासून स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहे.
राज्य सरकारचे दिनेशने मानले आभार
महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय तृतीयपंथीयांसाठी प्रेरणा देणारा निर्णय आहे. समाजामध्ये दोनच लिंग आहेत असे आपण समजतो. पण तृतीयपंथी हे देखील समाजाचा एक घटक असून तिसरे लिंग आहे. राज्य शासनाने सरकारी नोकऱ्यांमध्ये आम्हाला स्थान मिळवून दिलं आहे, त्याबद्दल आम्ही राज्य शासनाचे आभार मानतो. समाजामध्ये आम्हाला देखील चांगली वागणूक मिळावी. आम्ही देखील समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र शासनाने आम्हाला जी काही संधी दिली आहे, त्या संधीच आम्ही नक्कीच सोनं करू, अशी प्रतिक्रिया दिनेशने यावेळी दिली आहे.