नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात आज म्हणजेच शुक्रवार, १६ डिसेंबर रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. याचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही झाला असू सुरुवातीच्या व्यापारात दोन्ही मौल्यवान धातू लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याच्या किमती आज सुरुवातीच्या व्यवहारात ०.०१ टक्क्यांनी घसरल्या. तर वायदा बाजारात आज चांदी कालच्या बंद किमतीच्या तुलनेत ०.३९ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. काल म्हणजेच गुरुवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव १.०५ टक्क्यांनी आणि चांदीचा दर २.१२ टक्क्यांनी घसरला.

कामाची बातमी! सरकारने तेलावरील कर घटवला, जाणून घ्या चारही महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर
शुक्रवारी, फ्युचर्स मार्केटमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर कालच्या बंद किमतीपासून सकाळी ९.१० वाजेपर्यंत ६ रुपयांनी कमी होऊन ५४,१०१ रुपये प्रति १० ग्रॅम होता. सध्या सोन्याचा भाव ५४,१५७ रुपये झाला तर काल सोन्याचा भाव ५७५ रुपयांनी घसरून ५४,०९९ रुपयांवर बंद झाला. याशिवाय आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी लाल चिन्हात व्यवहार करत आहे. चांदीचा दर कालच्या बंद भावावरून २५६ रुपयांनी घसरून ६७,५६२ रुपये प्रति किलो झाला. चांदीचा दर आज ६७,६७३ रुपयांवर उघडला. तर मागील व्यापार सत्रात चांदीचा भाव १,४७२ रुपयांनी घसरून ६७,८३० रुपयांवर बंद झाला.

Share Market: अमेरिकन मार्केटमध्ये मोठी घसरण, BSE, NSE देखील कोसळले; पाहा व्यापाराच्या सुरुवातीची स्थिती
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे भाव
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. कालच्या शुक्रवारी बंद झालेल्या किमतीच्या तुलनेत आज सोन्याची स्पॉट किंमत १.५३ टक्क्यांनी घसरून १,७८०.०१ डॉलर प्रति औंस झाली. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर ३.४८ टक्क्यांनी घसरून २३.०२ डॉलर प्रति औंस झाला आहे.

बँक खात्यात जमा झाले ६ कोटी; मालामाल झालेल्या रॅपरने केलेली चूक तुम्ही करू नका
सराफा बाजारात तेजीला ब्रेक
गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. दिल्लीत सोन्याचा भाव ४२० रुपयांनी घसरून ५४,५५४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. बुधवारी सोन्याचे दर वाढून ५४,९७४ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. त्याचवेळी गुरुवारी चांदीचा भाव ८६९ रुपयांनी घसरून ६८,२५४ रुपये प्रति किलोवर बंद झाला. यापूर्वी बुधवारी चांदीच्या दरात वाढ दिसून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here