Authored by नागिंद मोरे | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Dec 2022, 1:32 pm

Dhule News : धुळे – चाळीसगाव महामार्गावर कंटेनर आणि बसचा भीषण अपघात झालाय. कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून आलेल्या बसने कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात ९ ते १० जण जखमी झाले असून चालक आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

 

dhule chalisgaon highway container and bus terrible accident
कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावला, मागून बसची जबर धडक; १० प्रवासी जखमी

हायलाइट्स:

  • कंटेनरला बसने मागून दिली जबर धडक
  • बसमधील ९ ते १० प्रवासी जखमी
  • धुळे – चाळीसगाव महामार्गावर भीषण अपघात
धुळे : धुळे – चाळीसगाव महामार्गावर अचानक थांबलेल्या कंटेनरला मागून आलेल्या बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात ९ ते १० जण जखमी झाले असून चालक आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तात्काळ उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धुळे चाळीसगाव महामार्गावर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास बस आणि कंटेनर यांचा अपघात होऊन ९ ते १० जण जखमी झाले आहेत. महामार्गावर असलेल्या रेल्वे स्टेशनचे फाटक बंद असल्याने तर्डी फाट्याजवळ पुढे चालणाऱ्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावला त्याचवेळी मागून आलेल्या बसने या कंटेनरला जोरदार धडक दिली. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने कंटेनरला मागून जबर धडक दिली. यावेळी बसमध्ये बसलेल्या ४२ प्रवासींपैकी ९ ते १० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. चालक महेंद्र पाटील (वय ३५) आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारार्थ धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी मोठी माहिती; अनाहिता पंडोल यांची ती एक चूक महागात पडली
गेल्या १५ दिवसांपूर्वी याच महामार्गावर एक अपघात होऊन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली होती. गेल्या अनेक वर्षांपासून धुळे चाळीसगाव महामार्गाची दुरावस्था झाली आहे. वारंवार होणाऱ्या अपघाताच्या घटना लक्षात घेता या महामार्गाच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. गरताड आणि पिंपरी ही दोन गावे या महामार्गावर असून अपघाताच्या वारंवार घडणाऱ्या घटना पाहता महामार्गावर गतिरोधक बसण्याची आणि रस्ता दुरुस्तीची देखील मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

‘कालनिर्णय’ २०२३ मध्ये संभाजीराजेंच्या राज्याभिषेकाचा उल्लेखच नाही; शंभूप्रेमींच्या संतापानंतर खुलासा

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here