या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, अन्यथा झालेला सर्व प्रकार व्हॉट्सअपवरील सर्व ग्रुपवर तसंच वरिष्ठ कार्यालय मंत्रालय आणि महिला आयोग यांना पाठवून मी माझ्या बाळाला घेऊन आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय राहणार नाही, असा इशारा पीडितेने पत्राद्वारे पोलीस अधीक्षकांना दिला आहे. याप्रकरणी आता काय कारवाई केली जाते, हे पाहावं लागेल.
Home Maharashtra panhala police station, वर्दीला डाग! पोलीस अधिकाऱ्याकडूनच महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी; संतापजनक...
panhala police station, वर्दीला डाग! पोलीस अधिकाऱ्याकडूनच महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी; संतापजनक घटना उघड – a police officer demands sex from a female police officer in panhala police station
कोल्हापूर : सर्वसामान्य नागरिकांचे रक्षण करणारे पोलीसच जर परिस्थितीचा गैरफायदा घेत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे पाहायचे असा प्रश्न निर्माण होत असतो. असाच एक प्रकार कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात घडला आहे. मात्र यामध्ये पीडिता ही कोणती सर्वसामान्य महिला नसून ती देखील पोलीस कर्मचारीच आहे. पन्हाळा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन थेट पोलीस ठाण्यात शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पीडित महिला कर्मचाऱ्याने संबंधित अधिकाऱ्याविरोधात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे गुरुवारी तक्रार दिली आहे.