वाचा:
औरंगाबादमधील सिल्लोडचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार सध्या मुंबईत असून करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने त्यांनी लीलावती रुग्णालयात उपचार घेतले. सत्तार यांच्यात करोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे चिंतेचे कोणतेही कारण नसून सध्या मुंबईतील शासकीय निवासस्थानात ते आयसोलेशनमध्ये आहेत. सत्तार यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.
अब्दुल सत्तार यांनी स्वत: याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. ‘थोडी शंका आली होती म्हणून आज करोना तपासणी केली. दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही. करोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करताना चुकून संसर्ग झाला असेल. आपल्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईन,’ असे ट्विट सत्तार यांनी केले आहे.
वाचा:
दरम्यान, करोनाच्या साथीत आढावा बैठका, कोविड केअर सेंटरला भेट, विभाग-राज्यस्तरावरील बैठका यामुळे मंत्री व लोकप्रतिनिधींना सातत्याने घराबाहेर पडावे लागते. त्यातूनच करोना संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला असून आतापर्यत सरकारमधील तीन मंत्र्यांना करोना संसर्गाचा सामना करावा लागला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांना सर्वप्रथम करोनाची लागण झाली होती. त्यांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना करोनाने गाठले. चव्हाण यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार झाले व त्यांनी करोनावर मात केली. त्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांना करोनाची लागण झाली. मुंडे यांच्यावर ११ दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारांनी ठणठणीत बरे होऊन मुंडे घरी परतले. आजच राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांचाही करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याआधी सोमवारी शिवसेनेचे सिंधुदुर्गातील आमदार वैभव नाईक यांनाही करोनाची लागण झाली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times