मुंबई:गौतम अदानी यांच्यासाठी वर्ष २०२२ कमाईच्या बाबतीत फलदायी ठरले आहे. अदानी याच वर्षी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले होते. तर त्यांच्या समूहाच्या जवळपास सर्व समभागांनी यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. ब्लूमबर्ग वर्ल्ड इंडेक्सच्या अहवालानुसार सर्वोत्तम कामगिरीच्या बाबतीत अदानी पॉवरच्या शेअर्सचा जगातील टॉप-५ समभागांमध्ये समावेश करण्यात आला. लक्षात घ्या की अदानी पॉवरच्या शेअर्सने या वर्षी YTD मध्ये २००% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

अदानी पॉवरने या वर्षात अनेक मोठे सौदे पूर्ण केले असून त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून आला. मात्र, शुक्रवारी अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. शेअर २.८० अंकांनी किंवा ०.८९ टक्क्यांनी घसरून ३१२.६५ रुपयांवर व्यवहार करताना दिसला.

IRCTC कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, काय आहे यामागचे मुख्य कारण; वाचा गुंतवणूकदारांनी काय करावं
अदानी पॉवरचा समभाग
अदानी पॉवरचा शेअर आज ३१५ रुपयांवर उघडला आणि ३१७ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. यानंतर शेअर ३१०.४५ रुपयांवर घसरला. ब्लूमबर्ग वर्ल्ड इंडेक्सच्या अहवालानुसार सर्वोत्तम कामगिरीच्या बाबतीत अदानी पॉवरच्या स्टॉकचा जगातील टॉप-५ समभागांमध्ये समावेश झाला आहे. अदानी समूहाच्या स्टॉकबद्दल बोलायचे तर गेल्या वर्षभरात अदानी पवारच्या शेअर्समध्ये २०९.१८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १६ डिसेंबर २०२१ रोजी अदानी पॉवरचे शेअर्स १०१.३० रुपयांवर होते. तर आज हा शेअर ३१२ रुपयांवर व्यवहार करत आहे. तसेच समभागाने गेल्या सहा महिन्यांत २० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Market Update: टाटाच्या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदार केले कंगाल; १ लाखाचे राहिले फक्त…
मल्टीबॅगर परतावा
अदानी पॉवरने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आकडेवारी पाहिल्यास शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. ब्लूमबर्ग वर्ल्ड इंडेक्सनुसार खाण कंपनी अडारो मिनरल्स इंडोनेशियाच्या स्टॉकला यावर्षी सर्वाधिक परतावा मिळाला असून या समभागाने YTD आधारावर १,१७४ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

एका महिन्यात केली दणदणीत कमाई, आता एका बातमीमुळे शेअर्सची जोरदार विक्री; तुम्ही काय करावं
जगातील अग्रणी ५ स्टॉक
दुसऱ्या क्रमांकावर तुर्की एअरलाइन्सचा स्टॉक असून गेल्या एका वर्षात ५४१ टक्के वाढ झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर केमिकल कंपनी सासा पॉलिस्टर सनायचे स्टॉकने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना ३०४ टक्क्यांहून अधिक परतावा दिला. Turkiye is Bakasi C या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्याने एका वर्षात २५० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आणि पाचव्या क्रमांकावर अदानी पॉवर स्टॉक आहे, ज्याने एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

अदानी पॉवरचा इतिहास
अदानी पॉवरने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमाई करून दिली आहे. गेल्या ५२ आठवड्यात कंपनीचा शेअर ७० रुपयांवरून ४३२ रुपयांपर्यंत वाढला तर मागील दोन-तीन वर्षांत गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. गौतम अदानी यांच्या नेटवर्थमधील या लक्षणीय वाढीमागे अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समधील वाढ एक मुख्य कारण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here