म. टा. प्रतिनिधी, पुणेः करोना विरुद्धच्या लढ्यात गणेशोत्सव मंडळांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. जय गणेश व्यासपीठच्या माध्यमातून शहराच्या मध्य भागातील २७२ हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी आरोग्योत्सवाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. करोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती संकलित करणे आणि घरी विलगीकरणासाठी मदत करणे अशा पद्धतीचे काम मंडळांच्या कार्यकर्त्यांमार्फत केले जात आहे.
()

बुधवार पेठेतील कोतवाल चावडी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या एसटीडी बुथ येथील कोविड मदत केंद्राचे उद्घाटन महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई गणपती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, माणिकराव चव्हाण, लोकसहभाग सहनियंत्रण अधिकारी राजेंद्र निंबाळकर, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे आशिष महादळकर, महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते, नितीन पंडित, संजय बालगुडे, अ‍ॅड.प्रताप परदेशी, रवींद्र माळवदकर, भाऊ करपे, सुनील रासने आदी उपस्थित होते. ‘प्रशासन आणि गणेश मंडळांच्या सहकार्याने पुण्यातील कोरोना मुक्तीचा लढा यशस्वी ठरेल,’ अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

वाचाः

अशी असेल कार्यकर्त्यांच्या कामाची पद्धत
क्षेत्रीय कार्यालयाकडून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी रुग्णाच्या भागातील मंडळांच्या प्रतिनिधींना सूचना देतील. यामुळे बाधित रुग्णाची संपूर्ण माहिती तसेच संपर्कात आलेल्या इतर सर्व व्यक्तींची माहिती मिळणे सोपे होईल. रुग्णाच्या घरातील सदस्य व त्याच्या संपर्कातील लोकांना सणस ग्राउंड येथील केंद्रात तपासणीसाठी पाठविले जाईल.

वाचाः

परिस्थिती पाहून घरी विलगीकरण करण्यास कार्यकर्ते प्रोत्साहन देतील. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची स्थिती असेल तर तसा निरोप यंत्रणेला दिला जाईल. प्रातिनिधिक स्वरुपात कसबा-विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत हे काम सुरू होणार आहे. टप्याटप्याने याची व्याप्ती सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाढविण्यात येणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here