नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज खाली घसरल्या आहेत. ब्रेंट क्रूड २.१७ डॉलरने घरून ७९.०४ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, WTI १.८२ डॉलरच्या घसरणीसह प्रति बॅरल ७४.२९ डॉलरवर उपलब्ध आहे. दररोज प्रमाणे आजही सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला दिसत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला दिसत आहे. पण मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये इंधनाच्या किंमतीत वाहनचालकांना कोणताही दिलासा मिळाला नाही.

कामाची बातमी! सरकारने तेलावरील कर घटवला, जाणून घ्या चारही महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी नवीन दर जाहीर
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता अपडेट करून नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. परिणामी सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल आणखी महागात खरेदी करावे लागते.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर आज देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. देशातील काही राज्यांमध्ये इंधन दरात काही बदल दिसून आले आहेत, मात्र देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जुन्याच दरावर कायम आहेत. जाणून घेऊया देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर-

महागाई घट कागदावर, स्वयंपाकघरात नाही; सर्वसामान्यांना दिलासा न मिळण्यामागे नेमकं कारण काय, जाणून घ्या
देशातील महानगरांची स्थिती
दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

कर्जदारांना ‘जोर का झटका’! देशातील सर्वात मोठ्या बँकेचं कर्ज महाग, आता भरावा लागणार जास्त EMI
दिल्लीकरांना CNG दरवाढीचा फटका
शनिवारी सकाळी दिल्लीकरांना महागाईचा धक्का बसला. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले असले तरी सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. १७ डिसेंबर रोजी सकाळी 6६ वाजल्यापासून दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली. आता १ किलो सीएनजी साठी दिल्लीच्या नागरिकांना ७९.५६ रुपये खर्च करावे लागतील. १७ डिसेंबर २०२२ रोजी पुन्हा एकदा सीएनजीच्या किमती बदल झाला आहे. नैसर्गिक वायूच्या दरात सातत्याने होत असलेल्या बदलानंतर आता सीएनजीच्या दरातही वाढ करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here