मुंबई: बुल मार्केट म्हणजे आर्थिक बाजारात तेजी असते किंवा ती तेजीची अपेक्षा असते. बुल मार्केटचा वापर शेअर बाजारासाठी केला जातो, परंतु इतर कोणत्याही बाजारात जिथे खरेदी आणि विक्री होते तिथे त्याचा वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ बाँड, रिअल इस्टेट, चलन आणि कमोडिटी. बुल बाजार अनेक महिने किंवा वर्षे टिकू शकतात. बाजारातील काही दिवसांच्या वाढीला बुल बाजार म्हणता येणार नाही. जेव्हा एखादा शेअर २०-२० टक्क्यांच्या दोन घसरणीनंतर २० टक्क्यांनी वाढतो, तेव्हा त्याला बुल मार्केट म्हटले जाते.

सुरुवातीला बुल बाजार ओळखणे कठीण आहे. बाजारात सतत अस्थिर असते, त्यामुळे स्टॉक किंवा इतर सिक्युरिटीज कधी घसरतील याबाबत स्पष्टपणे सांगता येऊ शकत नाही. म्हणूनच बुल बाजार पार पडल्यानंतरच विश्लेषक ते ओळखू शकतात.

भारतीय कंपनीच्या शेअरची जगभरात चर्चा; ३१५ रुपयाच्या शेअरचा दुपटीहून अधिक परतावा, गुंतवणूकदार मालामाल
अस्वल (बेअर) मार्केट म्हणजे काय?
जर वरील कल विरुद्ध दिशेने गेला म्हणजे बाजार दीर्घकाळ घसरत राहिला, आणि त्याला बेअर मार्केट म्हणतात. तर जेव्हा अर्थव्यवस्था मंदावायला लागते तेव्हा अनेकदा बेअर बाजार तयार होतात. बेअर मार्केटमध्ये निराशावाद पसरतो आणि गुंतवणूकदार फक्त त्यांचे पैसे काढण्याचा आणि बाजार सोडण्याचा प्रयत्न करतात.

त्यांना हे नाव कसे मिळाले?
साधारणपणे असे मानले जाते की बुल आणि अस्वल (बेअर) ज्या प्रकारे एखाद्यावर हल्ला करतात, त्याचेच येथे चित्रीकरण करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, बुलने एखाद्यावर हल्ला केला तर तो त्याला शिंगांनी उचलून वर फेकण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे, जेव्हा अस्वल एखाद्यावर हल्ला करते तेव्हा तो वरून उडी मारतो आणि समोरच्या व्यक्तीला खाली दाबण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जेव्हा ट्रेंड वर जात असतो तेव्हा तो बुल बाजार असतो आणि जेव्हा तो खाली येतो तेव्हा तो बेअर मार्केट असतो.

Market Update: टाटाच्या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदार केले कंगाल; १ लाखाचे राहिले फक्त…
अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे निर्देशक
बुल आणि बेअर बाजार, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे उत्तम सूचक आहेत. आर्थिक चक्रात ४ टप्पे असतात- उदय (विस्तार), शिखर (पीक), घसरण (पतन) आणि ट्रफ. ट्रफ म्हणजे अर्थव्यवस्था पूर्णपणे खाली घसरली आहे. बुल मार्केटची आवक वाढ दर्शवते तर, अस्वल बाजार घसरणीचा सूचक आहे.

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे २.७० लाख कोटी रुपये स्वाहा
गुंतवणूकदारांनी काय करावे?
बुल मार्केटमधून नफा मिळवण्यासाठी खरेदी करा आणि धरून ठेवा, या धोरणाचे पालन केले पाहिजे. म्हणजेच आता स्टॉक खरेदी करा आणि नंतर विक्री करा. मात्र, यामध्ये गुंतवणूकदारांनी त्यांच्या निर्णयांवर ठाम असले पाहिजे. तसेच जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत शेअर खरेदी करू नका. यानंतर, तुम्ही एका विशिष्ट मर्यादेत अधिक शेअर्स खरेदी करून ‘होल्ड’ करू शकता. दुसरीकडे, बेअर मार्केटमध्ये घाबरून जाण्याऐवजी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यावर लक्ष केंद्रित करा, विशिष्ट वेळी घसरण होत असली तरी तरीही मजबूत स्टॉक्समध्ये गुंतवणूक करा. असे करत असताना आपण किती नुकसान आणि किती काळ सहन करू शकता, हे लक्षात ठेवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here