चक्क गावाचा कारभार हाती घेण्यासाठी एकाच कुटुंबातील दोन जावा सरपंच पदासाठी एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. या लढतीत एकीकडे गावातील लोकांना वेगळाच पेच पडला आहे की, आता मतदान कुणाला करायचे आणि कुणाला नाराज करायचे? तोच दुसरीकडे या गावातील निवडणुकीला घेऊन ‘जाऊबाई जोरात’ ची चर्चाही चांगलीच रंगू लागली आहे.
मुंबईतील महामोर्चाला शरद पवार उपस्थित राहणार की नाहीत? महत्त्वाची माहिती समोर
भंडारा जिल्ह्यात येत्या १८ डिसेंबरला म्हणजे उद्या होणार असलेल्या ३०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्याच्या दीघोरी (आमगाव) या ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. या ग्रामपंचायतीमध्ये भावकीत निवडणुकीचा रणसंग्राम रंगला आहे. या गावातील नागदेवे कुटुंबातील दोन जावा सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत. मोठी जाऊ वीणा नागदेवे या आपल्या पॅनलकडून सरपंच पदासाठी लढत आहेत. तर त्यांच्या छोट्या जाऊ पायल नागदेवे अपक्ष म्हणून सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत.
दोन्ही जावा म्हणतात की निवडणुकीत कोणीही जिंकून आल्यावर परिवारात तडा जाणार नाही. मात्र, असं म्हणत असले तरीही एकमेकांच्या विरुद्ध प्रचारकरता जोर लावण्यात कोणीही मागे हटायला तयार नाहीय.