वाचाः
धायरी येथे राहणाऱ्या मनोज कुंभार या ३४ वर्षीय तरुणाला सकाळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे या तरुणाच्या मित्रांनी तातडीने ऑक्सिजन ॲम्बुलन्स बोलावून त्यामधून मनोजला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. दुपारी दोन वाजल्यापासून शहरातील अनेक मोठ्या रुग्णालयात जाऊन त्यांनी या तरुणाला ऍडमिट करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येकवेळी त्यांच्या पदरी निराशाच आली. आमच्याकडे सध्या ऑक्सीजन बेड उपलब्ध नाही तुम्ही रुग्णाला घेऊन दुसरीकडे जावा, असा सल्ला त्यांना हॉस्पिटल प्रशासनाकडून दिला जात होता. संबंधित तरुणाची करोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल उद्या येणार आहे.
वाचाः
तरुणाला बेड उपलब्ध न झाल्यानं तरुणाच्या नातेवाईकांनी अलका चौकात रुग्णवाहिका उभी करुन ठिय्या आंदोलन सुरू केलं. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला. अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून घडलेला प्रखार महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळवण्यात आला. त्यावर पालिकेनं दळवी रुग्णालयात बेड उपलब्ध करुन देत असल्याचं आश्वासन नातेवाईकांना दिलं. त्यानंतरचं नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतलं.
दरम्यान, पुण्यात पुन्हा लॉकडाऊननंतरही करोनाचा संसर्ग आटोक्यात आला नाहीये. आज चोवीस तासात ५५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. करोना मृतांचा आकडा १४४५ एवढा झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times