पुणे : पुण्यातील इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची आपापसात हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी म्हणजे काल सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या शिक्षकांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, नवीन शिक्षक येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सुभाष भिटे, उद्धव कुंडलिक गरगडे, संजीवनी गरगडे अशी भांडण करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. भिटे व संजीवनी गरगडे हे चाकाटीच्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. संजीवनी गरगडे यांचे पती उद्धव गरगडे हे लाखेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी भिटे व संजीवनी गरगडे यांची काही क्षुल्लक कारणावरुन भांडण झाली. त्यानंतर शाळा सुटताना उद्धव गरगडे आल्यानंतर दोघांविरुध्द एक अशी धुमश्चक्री सुरु झाली.

मुंबई : घाटकोपरमध्ये रुग्णालयाच्या इमारतीला आग; एकाचा मृत्यू; अनेक जण अडकल्याची माहिती
घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला आणि बघ्यांची एकच गर्दी जमली. त्यांनी या हाणामारीचे फोटो काढले आणि आपल्या मोबाईलवर याचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. या प्रकारानंतर पालक स्वस्थ बसले नाहीत त्यांनी निवेदन तयार केले. त्यावर इतर पालकांच्या सह्या घेतल्या आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या शिक्षकांमध्ये वारंवार वादविवाद होतात, हाणामारी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पाल्यांना शाळेच्या अभ्यासक्रमातील काहीही येत नाही. त्यामुळे या दोन्ही शिक्षकांची तातडीने बदली करण्यात यावी. नवीन शिक्षक येईपर्यंत आम्ही सर्व जण शाळा बंद करीत आहोत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाखाली ३५ पालकांच्या सह्या आहेत.

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबद्दल अनेकदा संमिश्र मते व्यक्त होत असतात. गरीबांच्या मुलांच्या शिक्षणाची किमान सोय होते, म्हणून या शाळांची भलावण केली जाते. मात्र, भलावण करणाऱ्यांची बोलती बंद करणारे कृत्य या शिक्षकांनी केल्यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार’; महामोर्चासमोर उद्धव ठाकरे गरजले; सरकारवर जोरदार हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here