अकोला : अकोला जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. अकोला शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

नेमकं काय आहे संपूर्ण प्रकार?

काल १६ डिसेंबरला दोन अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घराकडे निघाल्या होत्या. वाटेत त्यांना एक ओळखीचाच युवक भेटला. तो म्हणाला चला ‘मी’ तुम्हा दोघीला घरी सोडून देतो. असे म्हणून त्याने गाडीवर बसून दोघींनाही सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या पवन वाटिकेत नेले. त्यानंतर इथे त्याने चॉकलेट आणि थम्सअप म्हणजेच कोल्ड्रिंक प्यायला दिले. यावेळी त्या दोघींनी कोल्ड्रिंक्स आणि चॉकलेट खाल्लं. कोल्ड्रिंक्स प्यायल्यानंतर त्यांना गुंगी यायला लागली.

पनवेलमधील उड्डाणपुलाखाली आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात उडाली एकच खळबळ
तो युवक त्या दोघींनाही घेऊन टेरेसवर गेला, अन त्यांच्यावर जबरी संभोग केला. त्यावेळी त्याचा मित्रही तिथे दाखल झाला आणि त्यानेही त्या दोघींवर अत्याचार केले. या संपूर्ण अत्याचाराच्याकांडात चार जणांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. तर, यातील दोघांनी दोन्ही अल्पवयीन मुलीवर अच्यावर केला, तर अन्य दोघांनी त्यांना याबाबत सहकार्य केले असल्याचे कळते. पीडित मुलींपैकी एक १४ वर्षांची आणि एक १७ वर्षांची आहे.

असं आलं प्रकरण उघडकीस

दरम्यान, काल रात्री या दोन्ही अल्पवयीन मुलींना घरी पोहचायला उशीर झाला. म्हणजेच रात्रीचा एक वाजला. घरच्यांनी या दोन्ही मुलींना उशिरा आल्याबद्दल विचारणा केली. त्यानंतर मुलींनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. दोन्ही मुलींच्या नातेवाईकांनी लागलीच सिव्हिल लाइन पोलिस ठाणे गाठले. मुलीवर झालेल्या अत्याचारबद्दल तक्रार दिली. सध्या या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांकडून चौकशी सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय कांबळे करीत आहेत.

समृद्धी महामार्गावर हे चाललंय काय?; आज तिसरा अपघात… पती, पत्नी व ११ महिन्यांचे बाळ जखमी
आतापर्यत पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

या अत्याचाराबाबत सध्या पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले असून ऋषिकेश, करण आणि रोहित अशी तिघांची नावे असल्याचे कळते आहे. तरी अद्याप अत्याचार करणाऱ्या तरुणांची मूळ नावे कळू शकलेली नाहीत. दरम्यान, यातील ऋषिकेशने या दोन्ही मुलींना आपल्या दुचाकी गाडीवर बसवून पवन वाटिकेत घेवून गेला. त्यानंतर इथे कोल्ड्रिंक्समध्ये ऋषिकेशने दारू देऊन दोन्ही मुलीवर अत्याचार केला आहे. यासोबतच त्याच्या साथीदाराने तिच्यावर अत्याचार केला असल्याचं सद्यस्थितीत समजत आहे.

उदयनराजेंना सीमावादप्रकरणी अमित शहांची मध्यस्थी मान्य नाही?, म्हणाले, पंतप्रधानांची मध्यस्थी गरजेची
कोल्ड्रिंक्समध्ये प्यायला दिली दारू

दरम्यान पीडित दोन्ही अल्पवयीन मुलींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री कोल्ड्रिंक्स पीत असताना त्यामध्ये कडूपणा जाणवला. त्यामुळे त्यात दारू असावी असा संशय दोन्ही मुलींनी व्यक्त केला आहे. कोल्ड्रिंक्स प्यायल्यानंतर चक्कर आल्यासारखं दोन्ही मुलींना वाटलं म्हणजेच गुंगी आली. त्यानंतर दोन तरुणांनी आमच्यावर जबरी अत्याचार केल्याचे म्हटले आहे. तसेच यावेळी त्याचे अन्य मित्रही इथे उपस्थित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अत्याचार करणाऱ्या तरुणांनी दोन्ही मुलींना कोल्ड्रिंगमध्ये दारू दिली की अथवा दुसरं काही याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. तरीही आता वैद्यकीय चौकशीतच या सर्व बाबी स्पष्ट होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here