कायला आणि केली बिंगहॅम या जुळ्या बहिणींवर मे २०१६ मध्ये ‘शैक्षणिक अप्रामाणिकता’ म्हणजेच कॉपीचा आरोप करण्यात आला होता. मात्र बहिणींनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांची शालेय अभ्यासातील कामगिरी तपासली असता, ती सारखी असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले.
बहिणींनी ३०७ पैकी २९६ प्रश्नांची उत्तरं दिली होती, त्यापैकी ५४ प्रश्नांची चुकीची उत्तरं देण्यात आली होती. ही बाब विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना शंकास्पद वाटली. त्यामुळे त्यांनी तत्काळ दोघी बहिणींच्या विरोधात चौकशी सुरू केली.
न्यायालयाच्या दस्तऐवजानुसार, शाळेच्या चौकशी समितीने या जोडगोळीवर एकमेकांना संकेत दिल्याचा आणि परीक्षेदरम्यान नोट्स पास केल्याचा आरोप केला. त्यानंतर जुळ्या बहिणींनी परीक्षेत फसवणूक केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. कॉपीबहाद्दर बहिणी असा कलंक लागल्याने शाळेत झालेली नामुष्की आणि चिडवाचिडवीला सामोरं जावं लागल्याचं बहिणींनी सांगितलं.
कायलाने सांगितलं, की दोघी जणी शाळेत चर्चेचा विषय ठरल्या होत्या. आम्हाला मिळालेले समसमान गुण हा निव्वळ योगायोग असल्याचं शाळा प्रशासनाने नाकारलं. तर, आम्हा दोघींनाही माहिती होतं, की आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही, असं केली म्हणाली. परीक्षेला दोन आठवडे उलटल्यानंतर मेडिकल स्कूलच्या प्राध्यापकांनी दोघींवर फसवणूक केल्याचा आरोप केला.
हेही वाचा :
एकाच टेबलावर बसवलं असलं तरी आपण एकमेकांपासून चार ते पाच फूट अंतरावर होतो. तसंच परीक्षेदरम्यान मध्ये कॉम्प्युटरचा मॉनिटर असल्याने एकमेकींना पाहूही शकत नसल्याचं केलीने कोर्टात सांगितलं होतं.
आता सहा वर्षांनंतर बहिणींनी शालेय संस्थेविरुद्ध जिंकून आपल्या नावावरील कलंक साफ केला आहे. बहिणींच्या बाजूने निर्णय देणार्या ज्युरींनी त्यांना एकूण दीड मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास साडेबारा कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा :