रिचर्ड अँड क्रुडास कंपनी इथून हा मोर्चा दुपारी साडेबाराच्या सुमारा महामोर्चा सुरू झाला. दुपारी १२.३० वाजता सभेच्या ठिकाणी म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया बिल्डींगजवळ १ वाजेच्या सुमारास दाखल झाला. मोर्चाचं रुपांतर सभेत झालं. महामोर्चात सभेसाठी व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. यावेळी विविध पक्षांचे नेते व्यासपीठावर बसले. या प्रसंगी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षाचे नेते संजय राऊत यांना मान दिला. आदित्य ठाकरेंच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना बसण्यासाठी दिली आपली खुर्ची
महामोर्चात व्यासपीठावर सर्व नेते बसलेले होते. आदित्य ठाकरेही व्यासपीठावर बसलेले होते. यावेळी ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांना व्यासपीठावर बसण्यासाठी खुर्चीच नव्हती. आदित्य ठाकरे यांच्या हे लक्षात आलं. आदित्य ठाकरे खुर्चीवरून उठले आणि त्यांनी संजय राऊत यांना बसण्यासाठी खुर्ची दिली. यावेळी आदित्य ठाकरे हे स्वतः उभे राहिले. त्यांच्या या कृतीने सभेला उपस्थित असलेल्यान नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं लक्ष वेधलं. आता आदित्य ठाकरे यांचं कौतुक होतंय.
महाविकास आघाडीच्या महामोर्चावर फडणवीसांची बोचरी टीका, तीन पक्ष एकत्रित येऊनही…
महाविकास आघाडीच्या महामोर्चातील सभा ही दुपारी २ वाजेच्या सुमारास संपली. संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांची भाषणं झाली. महाविकास आघाडीतीली या नेत्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार तसंच केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, या सारख्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यावेळी म्हणाले.
महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल- शरद पवार