पिंपरी/पुणे : महापुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यावरून पिंपरी चिंचवड येथे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर चंद्रकात पाटील आज एका वेगळ्या रूपात पहायला मिळाले. चंद्रकांत पाटील चक्क फेस मास्क घालून कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून पाटील यांनी ही युक्ती लढवली असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावरील पोस्टमधून चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकीची धमकी देण्यात आली.

चंद्रकांत पाटील यांनी चक्क फेस मास्क घालून भाषणही केले. शाईफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत चंद्रकांत पाटील मास्क घालूनच कार्यक्रमाला पोहोचले. मास्क घालूनच त्यांनी भाषणही केलं आहे. पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील यांनी ही खबरदारी घेतली. त्यांचा हा फेस मास्क चर्चेचा विषय बनला आहे.

एखाद्याला शाई फेकून आनंद मिळत असेल तर चांगले आहे. सर्वांना प्रश्न पडेल की फेसशिल्ड घाबरून घालून आलेत का? मी घाबरत नाही. एखाद्याला शाई फेकून आनंद मिळतो. पण माझे कार्यकर्ते आणि पोलीस काय झोपलेले नाहीत, असे चंद्रकात पाटील यावेळी म्हणाले.

chandrakant patil face shield mask

पिंपरीतील कार्यक्रमात चंद्रकातं पाटील फेसशिल्ड घालून

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली आणि सहभागी बचत गटांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार उमा खापरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी महापौर माई ढोरे आदी उपस्थित होते.

महिला स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा आहेत. महिला बचत गटांना प्रशिक्षण आणि बाजार उपलब्ध करून दिल्यास ते अधिक सक्षमपणे काम करतील. बचत गटांनी नागरिकांची गरज ओळखून नवे उत्पादन आणि सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. बचतगटांना असे नवे प्रयोग करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पवनाथडी यात्रेच्या माध्यमातून ४०० बचत गटांना चांगली संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगून अशा उपक्रमाद्वारे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाई पेकीची धमकी, गुन्हा दाखल

दरम्यान, उच्च तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल समाजमाध्यमात बदनामीकारक टिप्पणी करून तेढ निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कथित पदाधिकाऱ्याविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत स्वप्नील बाबासाहेब बांगर (वय ३३, रा. परमहंस नगर, कोथरूड) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया पदाधिकारी विकास लोले या नावाच्या समाजमाध्यम खात्याविरोधात चिथावणी देणे, दोन गटांमध्ये तेढ निर्माण करणे, बदनामी करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्याविषयी आरोपीने समाजमाध्यमात तीन आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे बांगर यांच्या निदर्शनास आले. या ‘व्हायरल’ पोस्टमुळे पाटील यांची बदनामी झाली आहे. या पोस्टमध्ये समाजाच्या भावना भडकावणारे व चिथावणीखोर लेखन असून, त्यामुळे दोन गटांत तेढ निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. कोथरूड पोलिस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

जाहिरात फलकांच्या दरात वाढीचा निर्णय; महापालिकेच्या उत्पन्नात होणार वाढ

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगल्या कामासाठी पैसे देत आहेत. पण सरकारवर अवलंबून का राहत आहात. कर्मवीर भाऊराव पाटील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशात शाळा सुरू केल्या. शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नव्हते. आम्ही शाळा चालवतोय, पैसे द्या म्हणून त्यावेळी त्यांनी लोकांकडे भीक मागितली. त्यामुळे कंपन्यांनीही सामाजिक कार्यासाठी सहकार्य करावं. आपण मंदिरं उभारतो तेव्हा सरकारकडे थोडी पैसे मागतो, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पैठणच्या संत पिठाच्या कार्यक्रमात केलं होतं. यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

Pune : पत्नीचा शाब्दिक आणि मानसिक त्रास अन् सततची भांडणं… पतीने उचललं टोकाचं

4 COMMENTS

  1. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. in addition but thank god, I had no issues. significantly received item in a timely matter, they are in new condition. an invaluable so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    cheap jordans https://www.realjordansretro.com/

  2. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. or sometimes but thank god, I had no issues. similar to the received item in a timely matter, they are in new condition. direction so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    cheap louis vuitton bags https://www.louisvuittonsoutletonline.com/

  3. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. quite possibly but thank god, I had no issues. particularly received item in a timely matter, they are in new condition. in any event so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    cheap retro jordans https://www.realjordansshoes.com/

  4. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. or a but thank god, I had no issues. which includes received item in a timely matter, they are in new condition. you ultimately choose so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    authentic cheap jordans https://www.cheapsneakeronline.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here