जयपूरः राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी बंडखोर नेते यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केलीय त्यांची जनतेसमोर तोंड दाखवण्याचीही लायकी नाहीए, असं म्हणत अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांना मंगळवारी पुन्हा टीकेचं लक्ष्य केलं.

राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी कट रचला गेला. पण हा कट वेळी उघड झाल्याने विरोधकांचे मनसुबे उधळले गेले, असा पुनरुच्चार गहलोत यांनी केला. तसंच आपलं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावाही गहलोत यांनी केला.

राज्य सरकार एकीकडे करोनाच्या संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भाजपसोबत सत्ता उलथवण्याचा कट रचत होते. सचिन पायलट आणि इतर कुठल्याही नेत्याचं नाव न घेतला गहलोत यांनी हा आरोप केला. हा प्रकार अजिबात खपवून घेणार नाही तो निषेधार्ह आहे. पक्षाशी गद्दारी करण्याऱ्यांना जनतेत तोंड दाखवायलाही जागा नाही, असं गहलोत म्हणाले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.

देशात लोकशाहीला दुबळं करण्याचा हा प्रयत्न आहे. पण काँग्रेस आमदार असं होऊ देणार नाहीत. ते लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत, असं गहलोत म्हणाले. यासंदर्भात काँग्रेसचे मुख्य व्हीप महेश जोशी यांनी अधिकृतपणे पत्रक जारी केलं आहे. सत्याचा विजय होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. आपलं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करेल. सत्याचा विजय होऊन हे सरकार पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास गहलोत यांनी व्यक्त केला.

लपाछपीचा खेळ करून सत्य आपलं करता येत नाही, असं गहलोत म्हणाले. यावेळी गहलोत यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या भारतीट ट्रायबल पार्टी आणि राष्ट्रीय लोक दलाच्या आमदारांचे आभार मानले. यावेळी आमदारांनी गहलोत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. आपण सर्वांनी मिळून सत्याचा विजय करू, असं ते आमदार म्हणाले. राजस्थान काँग्रेसने आठवडाभरात बोलावलेली विधिमंडळ पक्षाची ही तिसरी बैठक होती.

पायलट यांची आमदाराला नोटीस

सचिन पायलट यांनी आपल्याला ३५ कोटींची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस आमदार गिरराजसिंह मलिंगा यांनी केला होता. आता सचिन पायलट यांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. आमदार खोटे आणि द्वेषपूर्ण आरोप करत आहेत, असं पायलट यांनी म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here