Authored by जयंत सोनोने | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 18 Dec 2022, 11:36 am

Amravati News : अमरावतीच्या तिवसा शहरात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तिवसा शहरातील यादव देशमुख महाविद्यालयात ही कबड्डी स्पर्धा सुरु आहे. या कबड्डी स्पर्धेदरम्यान आज सायंकाळी ७:२० वाजताच्या सुमारास एका युवकाच्या मानेवर ब्लेडने हल्ला करण्यात आला.

 

young man attacked blade while watching Kabaddi
कबड्डी स्पर्धा सुरु असताना तरुणासोबत धक्कादायक प्रकार; अमरावतीमधील प्रकाराने सर्वत्र खळबळ

हायलाइट्स:

  • कबड्डी स्पर्धेदरम्यान तरुणावर ब्लेडने हल्ला
  • नितीन सर्कल पवार असे हल्ला झालेल्या मुलाचे नाव
  • अमरावतीमधील तिवसा येथील धक्कादायक प्रकार
अमरावती : राज्यात दिवेसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील गुन्ह्याच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यातच आज जिल्ह्यातील तिवसा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिवसा शहरात एका युवकावर ब्लेडने हल्ला करण्यात आला आहे.

नितीन पवार असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे. देशमुख महाविद्यालयाच्या मैदानात विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यानच नितीन हा कबड्डी स्पर्धा पाहत असताना तेथून काही अंतरावर मागून आलेल्या तीन ते चार युवकांने शिवीगाळ करत त्याच्यावर ब्लेडने हल्ला केला. जवळ असलेल्या ब्लेडने नितीनच्या मानेवर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जुन्या वादातून हा हल्ला केल्याची माहिती देण्यात आली आहे.

IND vs BAN – टीम इंडियाने घेतला वनडे सामन्याचा बदला, भारताने दाखवला ‘दस का दम’
या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यात २ युवकांना तिवसा पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास तिवसा पोलीस करत आहेत.

नांदेडमधील या गावात २० वर्षांपासून सरपंचच नाही; गावकरी म्हणतात…

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

1 COMMENT

  1. Цветы темрюк доставка букетов
    Купить Цветы Темрк Голубицкая Курчанская
    доставка цветов
    Новогодние подарки Floristtemruk
    Цветы букеты шляпные коробки
    Ватсап телеграм вк ок
    vkontakte odnoklassniki instagram telegram TG Цветы доставка
    [url=https://vk.com/floristtemruk_ru]https://vk.com/floristtemruk_ru[/url]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here