दरम्यान, लांजामध्ये आमदार राजन साळवी यांना मानणारे जसे नगरसेवक आहेत, तसेच मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांनाही मानणारे नगरसेवक आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून लांजामध्ये शिवसेनेत मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष मनोहर बाईत, नगरसेविका समृद्धी गुरव, वंदना काडगाळकर, सोनाली गुरव, सचिन डोंगरकर, प्रसाद डोर्ले यांच्यासह अपक्ष नगरसेविका मधुरा बापेरकर, दुर्वा भाईशेटे या सात नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का बसला आहे.
Home Maharashtra shivsena rajan salvi, कोकणात उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवींना धक्का; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात...
shivsena rajan salvi, कोकणात उद्धव ठाकरे समर्थक राजन साळवींना धक्का; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात गणिते बदलली! – shivsena chief uddhav thackeray supporter mla rajan salvi big set back in konkan
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का बसला आहे. कारण साळवी यांच्या मतदारसंघातील लांजा नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. लांजा नगरपंचायतीमधील ठाकरे गटाचे नगराध्यक्ष आणि ५ नगरसेवक तसेच २ अपक्ष नगरसेवकांनी रत्नागिरीतील जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला.