दोहा, कतार : फुटबॉल वर्ल्डकप कोण जिंकणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. फुटबॉल वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिना आणि फ्रान्सने २-२ गोल केल्याने अरिक्त वेळ देण्यात आला. यात वेळेती दोन्ही संघाकडून एक-एक गोल करण्यात आला. म्हणजे ३-३ अशी बरोबरी झाली आणि अतिशय रोमांचक आणि थरारक टप्प्यात म्हणजे पेनल्टी शूट आउटमध्ये सामना गेला. या पेनल्टी शूट आउटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली. सर्वत्र एकच जल्लोष करण्यात आला. अर्जेंटिनाला मेस्सीने वर्ल्डकप जिंकून दिला, असा दावा मेस्सीच्या चाहत्यांकडून केला जातोय. पण अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून दिला तो त्यांच्या गोल किपरने . त्याचं नाव आहे इमिलियानो मार्टिनेस.
अर्जेंटिनाने तब्बल ३६ वर्षांनी फुटबॉल वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला आहे. अर्जेंटिनाने यापूर्वी १९७८ आणि १९८६ मध्ये फुटबॉल वर्ल्डकप जिंकला होता, तर २०१४ मध्ये अर्जेंटिनाचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले होते. यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ आधीपासूनच चर्चेत होता. याचं कारण आहे अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी. मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप होता. त्यामुळे तो वर्ल्डकप जिंकून देणार का? याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. फ्रान्सबरोबर वर्ल्डकपमध्ये झालेल्या फायनलमध्ये मेस्सीने चमकदार कामगिरी केली. मेस्सीनेही गोल केले. सामन्यात पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सवर दोन गोल करत आघाडी घेतली. पण सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्से आक्रमक खेळी करत दोन गोल केले आणि सामना बरोबरत आला.
सामना बरोबर झाल्यानंतर दोन्ही संघांना अतिरिक्त वेळ देण्यात आला. या वेळेत दोन्ही संघांनी एक-एक गोल केल्याने पुन्हा सामना ३-३ असा बरोबर आला. यामुळे अखेर या फायनल सामन्याचा निकाल पेनेल्टी शूटआउटमध्ये गेला.