लिओनेल मेस्सीचे वडील एका कारखान्यात काम करत असत. तर आई क्लिनर म्हणून काम करत होती. मात्र, त्याचे वडील एका क्लबचे प्रशिक्षक देखील होते. म्हणूनच त्यांच्या घरात फुटबॉलचे वातावरण होते. अशा परिस्थितीत लिओनेल मेस्सी स्वतः वयाच्या ५ व्या वर्षी एका क्लबमध्ये सहभागी झाला. तेथे तो या खेळाच्या मूलभूत गोष्टी शिकला. पुढे वयाच्या ८ व्या वर्षी मेस्सीने आपला क्लब बदलला आणि तो नेवेल ओल्ड बॉईज क्लबमध्ये गेला. पण काही काळाने अशी घटना घडली, ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मेस्सीला लहानपणीच जडला गंभीर आजार
वयाच्या ११ व्या वर्षी लिओनेल मेस्सीला ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी नावाचा आजार जडला. या आजारात कोणत्याही व्यक्तीची प्रगती थांबते. त्याचा हा आजार वाढत गेला असता तर त्याची वयाच्या ११ व्या वर्षी जेवढी उंची होती ती तेवढीच राहिली असती.
हा आजार झालेला असताना मेस्सीच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. दरम्यान, फुटबॉलपटू म्हणून लिओनेल मेस्सीची वाढ सुरूच होती. रिव्हर प्लेट यांनी मेस्सीला आपल्यासोबत ठेवाले असे त्याच्या कुटुंबीयांना सांगितले. पण तो मेस्सीची महागडा औषधोपचार करण्यास मात्र असमर्थ होता. याच दरम्यान मेस्सीचे नशीब बदलले. फुटबॉल क्लब बार्सिलोना त्यावेळी खेळाडू म्हणून लहान मुलांवर लक्ष ठेवून होते. टॅलेंट हंट अंतर्गत, लहान शहरे, शाळा, महाविद्यालये आणि विविध क्लबमध्ये हे केले जात होते.
बार्सिलोना फुटबॉल क्लबचे स्पोर्टिंग डायरेक्टर कार्लेस रझाक यांना लिओनेल मेस्सीबद्दल माहिती मिळाली. क्लबने मेस्सीला साइन केले. यासोबतच औषधांचा आणि आजारावरील उपचारांचा संपूर्ण खर्च देण्यास क्लब तयार झाला. अट एवढीच होती की मेस्सीला अर्जेंटिना सोडून बार्सिलोनाला जावे लागेल. कुटुंबाने हे मान्य केले आणि अशा प्रकारे लिओनेल मेस्सीची व्यावसायिक फुटबॉल कारकीर्द सुरू झाली.
२००१-२००२ चा काळ लिओनेल मेस्सीसाठी युरोपमध्ये स्थायिक होण्यासाठी आणि क्लब हस्तांतरणाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी घालवला गेला. परंतु त्याची बार्सिलोना-बी संघात निवड झाली. याच दरम्यान त्याने जवळजवळ प्रत्येक सामन्यात किमान एक गोल केलाच. अशात सीझनमध्ये त्याने ३० सामन्यांत एकूण ३५ गोल केले. वयाच्या १४ व्या वर्षी लिओनेल मेस्सी या संघाचा एक भाग होता आणि पुढे त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहिली. मेस्सी एका छोट्या लीगमध्ये स्वत:चे नाव करत होता. तसेच दिवसेंदिवस त्याचा खेळही उत्तमोत्तम होत होता.
सन २००४-५ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्लबमध्ये पदार्पण केले. बार्सिलोनाकडून फुटबॉल खेळणारा तो तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. लिओनेल मेस्सीने १ मे २००५ रोजी वरिष्ठ संघासाठी पहिला गोल केला.तसेच लिओनेल मेस्सीने २४ जून रोजी एक वरिष् खेळाडू म्हणून बार्सिलोनासोबत करार केला आणि त्यानंतर जे पुढे तो संपूर्ण इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे.