नवी दिल्लीः काही भागांमध्ये आणि स्थानिक पातळीवर करोनाचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. आणि सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचं काही राज्यांनी म्हटलंय. पण देशात कुठेही सामूहिक संसर्गाला सुरुवात झालेली नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

सामूहिक संसर्गाची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेनं अजूनही नश्चित केलेली नाही. सामूहिक संसर्गचा टप्पा ठरण्याचा निर्णय संघटनेने संबंधित देशांना दिले आहेत, असं केंद्रीय आरोग्य विभागाचे विशेष अधिकारी राजेश भूषण यांनी सांगितलं. एखाद्या व्यक्तील करोनाचा संसर्ग झाला आहे. ही व्यक्ती कोणाच्या संपर्कात आली. हे सांगण्यास ते असमर्थ ठरत असेल. यामुळे करोना संसर्गाच्या साखळीचा तपास लावणं अवघड ठरत असेल, तेव्हा सामूहिक संसर्ग सुरू झालाय असं मानलं जातं, असं राजेश भूषण म्हणाले.

दिल्लीतील सेरो सर्व्हेबाबतही भूषण यांनी स्पष्टीकरण दिलं. एकूण लोकसंख्येपैकी फक्त २० टक्के जण करोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. या अर्थ सामूहिक संसर्ग सुरू झाला असा होत नाही. सामूहिक संसर्गावरून काही तांत्रिक दावे केले जात आहे आणि यात कंटेन्मेंट झोनमध्ये किती प्रभावीपणे नियमांची अंमलबजावणी केली गेली हे महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.

काही भागांमध्ये आणि स्थानिक पातळीवर करोनाचा संसर्ग आहे. तिथे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. पण तो सामूहिक संसर्ग आहे असं म्हणता येणार नाही, असं राजेश भूषण म्हणाले. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यात सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचं म्हटलं होतं. राज्यातील तिरुवनंतपूर जिल्ह्यात सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचं ते म्हणाले. तर पश्चिम बंगालमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचं वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे.

देशातील एकूण करोना रुग्णसंख्या ११ लाखांवर

गेल्या २४ तासांत देशभरात ३७ हजार १४८ रुग्णांची भर पडून एकूण करोनारुग्ण ११,५५,१९१ झाले आहेत. गेल्या २४ तासांत करोनामुळे ५८७ मृत्युंची नोंद झाली असून आतापर्यंत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २८,०८४ वर पोहोचला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here