मुंबई: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजाराने गेल्या दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लावला. भारतीय मार्केटने आज म्हणजेच १९ डिसेंबर रोजी हिरव्या चिन्हावर व्यवहार करण्यास सुरुवात केली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी, वाढीसह उघडला. आज आशियाई बाजारातून कमजोर संकेत मिळत आहेत, ज्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला. आशियाई बाजारात आज फक्त हँगसेंगमध्ये तेजी व्यवहार करत असून उर्वरित निर्देशांकांत घसरण दिसत आहेत.

शुक्रवारच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स ४६१ अंकांनी घसरून ६१,३३७ अंकांवर तर निफ्टी १४६ अंकांनी घसरून १८,२६९ अंकांवर बंद झाला. शुक्रवारनंतर दोन दिवसांच्या व्यापार सत्रात निफ्टी ३९० अंकांनी तर सेन्सेक्स १,३४० अंकांनी घसरला आहे.

मालामाल! IPO पूर्ण सबस्क्राइब झाला नाही, गुंतवणूक करणारे आज बनले करोडपती; वाचा कोणता आहे हा शेअर
शेअर बाजाराची सुरुवात
सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या चिन्हावर उघडले. दरम्यान, आशियाई बाजारातील मंदीमुळे बाजारावर दबाव दिसत आहे. देशांतर्गत बाजाराने गेल्या दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लावला आणि सेन्सेक्सने ६८ अंकांनी वाढून ६१,४०५ च्या पातळीवर व्यवहार सुरू केला. त्याच वेळी, आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, निफ्टी १९ अंकांच्या वाढीसह १८,२८८ वर उघडला. याशिवाय बँक निफ्टीमध्ये १२६ अंकांची वाढ दिसून आली आणि त्याने ४३,३४६ वर व्यापार सुरु केला.

शेअर बाजारात ‘बुल’ आणि ‘बेअर’ म्हणजे काय? जाणून घ्या ह्यामध्ये गुंतवणुकीची रणनीती कशी असावी
आशियाई बाजार दबावाखाली
सोमवारी SGX निफ्टीने ६० अंकांपेक्षा जास्त वाढ नोंदवली तर इतर आशियाई बाजार दबावाखाली असले तरी डाऊन फ्युचर्स वाढलेला दिसत आहेत. जपानचा निक्की १ टक्क्यांनी तर कोरियाचा कोस्पी ०.३१ टक्क्यांनी घसरला आहे. तसेच डॉलर निर्देशांक १०४.२८ च्या पातळीवर व्यवहार करत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८० डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्सने साप्ताहिक आधारावर १.३६ टक्क्यांची घसरण नोंदवली तर अमेरिकन डाऊन जोन्स देखील साप्ताहिक आधारावर १.६६ टक्क्यांनी घसरला.

भारतीय कंपनीच्या शेअरची जगभरात चर्चा; ३१५ रुपयाच्या शेअरचा दुपटीहून अधिक परतावा, गुंतवणूकदार मालामाल
मार्केट प्री-ओपनिंगमध्ये
आज शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजार हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४८.६५ अंकांच्या म्हणजेच ०.२७ टक्क्यांच्या वाढीसह १८,३१७.३५ च्या पातळीवर उघडला. तर बीएसईचा सेन्सेक्स ३५.८४ अंक म्हणजेच ०.०६ टक्क्यांनी वाढून ६१,३७३.६५ च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

देशांतर्गत शेअर बाजाराची स्थिती
मागील आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी अतिशय व्यस्त ठरला. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात बरीच घसरण पाहायला मिळाली. परिणामी पहिल्या १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांचे बाजार भांडवल एकूण १,२२,०९२.९ कोटी रुपयांनी घटले. यामध्ये एचडीएफसी बँक वगळता इतर ९ कंपन्यांच्या बाजार मूल्यांकनात घसरण झाली. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) ३० शेअर्सच्या सेन्सेक्स निर्देशांकात घसरण झाली आणि निर्देशांक ८४३.८६ अंकांनी किंवा १.३६ टक्क्यांनी घसरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here