सोशल मीडियावरही हाच प्रश्न विचारला जात आहे. लुसेल स्टेडियममध्ये दीपिका पादुकोण आणि इकर कॅसिलास यांनी फिफा वर्ल्ड कपची ट्रॉफी लाँच केली.
१८ कॅरेट सोन्यापासून तयार केलेली ट्रॉफी
फिफा वर्ल्ड कप २०२२ ची ट्रॉफी १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. या ट्रॉफीला सगळेच जण हात लावू शकत नाहीत. केवळ काही खास लोकांना या ट्रॉफीला हात लावण्याची परवानगी आहे. या खास लोकांच्या लिस्टमध्ये दीपिका आणि इकर कॅसिलासचं नाव सामिल आहे.
हेही वाचा – दोन मिनिटांत फ्रान्सचे दोन गोल, मेस्सीचा कमबॅक अन् पेनल्टी! वाचा मिनिटां-मिनिटांला कसा पलटला गेम
फिफाची ट्रॉफी लाँच करण्यासाठी दीपिकाची निवड का करण्यात आली?
FIFA विश्वचषक ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी दीपिका पादुकोणची निवड करण्यात आली कारण या ट्रॉफीची केस जागतिक लक्झरी ब्रँड लुई विटॉनने (Louis Vuitton) डिझाइन केलेली आणि बनवली आहे. दीपिका या लग्झरी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्याशिवाय दीपिका इतरही अनेक आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्सचा ग्लोबल चेहरा देखील आहे. टाईम मॅगझिनमध्येही दीपिकाचं दोन वेळा नाव आलं होतं. शिवाय दीपिका पादुकोणने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही खास एंट्री केली होती. याची ती ज्युरी मेंबरही होती.
पठाण गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे वाद
दीपिका पादुकोणचा आगामी सिनेमा ‘पठाण’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा सिनेमा २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसह इतर अनेक कलाकार आहेत. सध्या देशातील काही राज्यांमध्ये या चित्रपटावरून चांगलाच गदारोळ सुरू आहे. काही हिंदू आणि मुस्लिम संघटना ‘पठाण’च्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. ‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. ही भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असून भगव्या रंगाचाही अपमान केला असल्याचं काही हिंदू आणि मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे. निर्मात्यांनी जाणीवपूर्वक चुकीच्या उद्देशाने अशा रंगाचा वापर केला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.