नवी दिल्ली: फिफा विश्वचषकाच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. या विजयासह अनुभवी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची अनेक वर्षांची विश्वचषक विजयची प्रतीक्षा संपुष्टात आली. एकीकडे सर्वांचे लक्ष काल मेस्सी आणि किलियन एम्बाप्पेच्या कामगिरीकडे लागले होते. तर या सामन्यादरम्यान सर्व गुंतवणूकदारांच्या नजरा नाइके आणि आदिदासच्या शेअर्सवर खिळल्या होत्या. कारण आदिदास अर्जेंटिना संघ तर नाईकी फ्रेंच संघाचे मुख्य प्रायोजक आहे. तब्बल ३६ वर्षानंतर अर्जेंटिनाच्या विश्वचषक विजयात मेस्सीचा मोठा वाटा आहे.

दोन मिनिटांत फ्रान्सचे दोन गोल, मेस्सीचा कमबॅक अन् पेनल्टी! वाचा मिनिटां-मिनिटांला कसा पलटला गेम

विजय अर्जेंटिनाचा, भाव खाल्ला आदिदासने
फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील संघांच्या पराभवाचा आणि विजयाचा परिणाम कंपन्यांच्या शेअर्सवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. आदिदास जर्सी परिधान केलेल्या अर्जेंटिनाच्या संघाच्या विजयानंतर कंपनीचे शेअर्स १.९३ टक्क्यांनी वाढून १२१.३० युरो (फ्रँकफर्ट स्टॉक एक्सचेंज) वर बंद झाले. त्याच वेळी, नाइकेची जर्सी परिधान केलेल्या फ्रान्सच्या पराभवामुळे कंपनीचे (फ्रँकफर्ट स्टॉक एक्सचेंज) समभाग १.९६ टक्क्यांच्या घसरणीसह १०० युरोच्या पातळीवर बंद झाले.

एडिडासचे ‘अच्छे दिन’ परतले!
आदिदासच्या शेअर्समध्ये यावर्षी ५३.२६ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. मात्र, विश्वचषक सुरू होण्याच्या काही दिवस आधीच कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. ३ नोव्हेंबरपासून कंपनीच्या शेअरच्या किंमती २८ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.

जाळ अन् धूर…; मेस्सीप्रेमी कोल्हापूरकरांचा मध्यरात्री रस्त्यावर तुफान जल्लोष

प्रायोजक संघांच्या कामगिरीचा कंपनीच्या शेअर्सवर कसा परिणाम होतो?
२०१८ फिफा विश्वचषकदरम्यान आदिदास जर्मनीचे मुख्य प्रायोजक होते. मात्र संघ लवकरच स्पर्धेतून बाहेर पडला. सीकिंग अल्फा या गुंतवणुकीशी संबंधित वेबसाइटच्या अहवालानुसार, त्यामुळे विश्वचषकादरम्यान आदिदासचे शेअर्स ६ टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे, नाइके मुख्य प्रायोजक कसल्या फ्रान्सच्या संघाने विश्वचषक जिंकला आणि कंपनीचा स्टॉक ४ टक्क्यांपर्यंत वाढला.

केवळ चॅम्पियनच नाही, तर हरणाऱ्या संघावरही डॉलर्सचा पाऊस; जाणून घ्या, कोणाला किती पैसे मिळाले
यापूर्वी २०१४ मध्ये उलट घडले. अर्जेंटिना आणि जर्मनी अंतिम फेरीत पोहोचले. आदिदास दोन्ही संघाचे मुख्य प्रायोजक होते. या सामन्यात जर्मनीने विजेतेपद जिंकले आणि त्याचा परिणाम आदिदासच्या विक्रीवर दिसून आला. २०१४ मध्ये आदिदासची फुटबॉलशी संबंधित विक्री एकूण २.१ अब्ज युरो होती, ज्यामध्ये कंपनी सुमारे १० कोटी जर्सी विकण्यात यशस्वी ठरली.

फुटबॉल वर्ल्डकप दोन्ही ब्रँडसाठी इतका खास का?
जगभरातील खेळांचे बाजार मूल्य २०० अब्ज डॉलर आहे. या दोन ब्रँडमधील खरी लढाई ही मार्केट कॅप त्यांच्या बाजूने मिळवण्याची आहे आणि फुटबॉल ही दोन्ही कंपन्यांसाठी मोठी स्पर्धा आहे. फुटबॉलच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की गेल्या विश्वचषकाची फायनल टीव्हीवर १.१ अब्जाहून अधिक लोकांनी पाहिली होती. हेच कारण आहे की दोन्ही संघ मार्केटिंगसाठी जगातील सर्वात लोकप्रिय खेळचा वापर करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here