नवी दिल्ली: नारायण मूर्ति आणि सह अभ्यंत्यांनी सुरु केलेली इन्फोसिस आज देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी बनली आहे. एन.आर. नारायण मूर्ति आणि त्यांच्या सहा सहकारी अभियंत्यांनी मर्यादित संसाधनांसह १९८१ मध्ये कंपनीची स्थापना केली होती. मात्र चार दशकांच्या प्रवासात या कंपनीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इन्फोसिसची यूएस स्टॉक एक्स्चेंज (नॅस्डॅक) वर १९९९९ मध्ये नोंद झाली आणि ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय कंपनी होती.

मालामाल! IPO पूर्ण सबस्क्राइब झाला नाही, गुंतवणूक करणारे आज बनले करोडपती; वाचा कोणता आहे हा शेअर

मात्र, इथंवरचा प्रवास मूर्ति दाम्पत्यांसाठी सोपा नव्हता. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील नारायण मूर्ति यांनी पत्नी सुधा मूर्ति यांच्याकडून १० हजार रुपये घेऊन कंपनीचा पाया घातला होता. आणि आज तिचे मार्केट कॅप ६४०,६१७.१९ कोटी रुपये आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि HDFC बँक नंतर इन्फोसिस भारतातील चौथी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. आज देशातील स्टार्टअप कंपन्यांसाठी ते एक उदाहरण बनले आहे.

इन्फोसिस नारायण मूर्तिचा दुसरा उपक्रम होता. यापूर्वी त्यांनी १९७० च्या दशकात पहिला उपक्रम सुरू केला होता, पण तो चालला नाही. यानंतर त्यांनी पटनी कॉम्प्युटरमध्येही काम केले, पण तिथे ते रमले नाही. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा विचार केला. मात्र यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्यांनी पत्नी सुधा यांची मदत घेतली. एका मुलाखतीत नारायण मूर्ति यांनी सांगितले की त्यांची पत्नी सुधा त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक अडचणीत त्या त्यांच्या पाठीशी उभी राहिल्या. इन्फोसिससाठी त्यांनी पत्नी सुधा मूर्ति यांच्याकडे १०,००० रुपयांचे कर्ज मागितले. एका मुलाखतीत सुधा मूर्ति यांनी सांगितले की, तिच्या पतीने तिला पैसे देण्यास कसे पटवले.

पत्नीकडून कर्ज घेत सुरु केली कंपनी, आज हजार कोटींचं साम्राज्य; मेहनत आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

आईची शिकवण
१० हजार रुपये देताना तुम्हाला काळजी वाटली नाही का? असा प्रश्न सुधाला विचारला असता त्या म्हणाल्या, “माझे लग्न झाले तेव्हा माझ्या आईने मला काही पैसे माझ्याकडे ठेव आणि ते फक्त आणीबाणीच्या वेळीच वापरायला शिकवले. याचा वापर साड्या, सोने किंवा इतर काही खरेदीसाठी नाही तर फक्त आपत्कालीन परिस्थितीतच वापरायला सांगितले. मूर्ति आणि माझ्या पगारातून दर महिन्याला काही पैसे मी बाजूला ठेवायचे, पण मूर्ति यांना याची माहिती नव्हती. मी डब्यात पैसे ठेवायचे, ज्यामध्ये १०,२५० रुपये होते.

सुधा मूर्ति पुढे म्हणाल्या, “मूर्ति यांनी सॉफ्टवेअर क्रांतीबद्दल सांगितले. इतिहासाचा दाखला देत आपण मागे का पडलो, मला समजावलं. यात आणीबाणी काय आहे? असे मी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “माझे स्वप्न आहे. ते पूर्ण होईल की नाही, माहीत नाही. मूर्ति एक मेहनती व्यक्ती आहेत हे मला माहीत होतं. हे पैसे मी दिले नसते तर त्याला आयुष्यभर पश्चाताप झाला असता, जे अपयशापेक्षा वाईट ठरले असते. ते नापास झाले असते तर त्याला पुन्हा नोकरी मिळाली असती. पण मला ज्याची खंत आहे, ती आणखी वाईट होईल. म्हणून मी त्याला फक्त १०,००० रुपये दिले आणि २५० रुपये माझ्याकडे ठेवले.”

भारतासाठी हे अतिशय लज्जास्पद; ऋषी सुनक यांचे सासरे नारायणमू्र्ती यांनी असे का म्हटले?
आज तीन लाखांहून अधिक कर्मचारी
नारायण मूर्ति यांच्यासह नंदन निलेकणी, एनएस राघवन, एस गोपालकृष्णन, एसडी शिबुलाल, के दिनेश आणि अशोक अरोरा हे देखील इन्फोसिसचे सह-संस्थापक होते. हे सर्व पटनी कॉम्प्युटरमध्ये एकत्र काम करायचे आणि सर्वांनी मर्यादित साधनांच्या बळावर देशातील सर्वात यशस्वी आयटी कंपनी, इन्फोसिसचा पाया घातला.

३१ मार्च २०२२ पर्यंत इन्फोसिसचा महसूल १६.३ अब्ज डॉलर होता आणि कंपनीत सुमारे ३१४,००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. १ ऑगस्ट २०१४ रोजी कंपनीने विशाल सिक्का यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पहिल्यांदाच कंपनीची धुरा बाहेरच्या व्यक्तीकडे सोपवण्यात आली. पण त्यांच्या कार्यकाळात वाद निर्माण झाला आणि तीन वर्षांनी ते पायउतार झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here