कतार : पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव करून अर्जेंटिनाने २०२२ चा फिफा विश्वचषक जिंकला. या विजयाने लिओनेल मेस्सीचे विजेतेपदाचं स्वप्नही पूर्ण झाले. मेस्सीची स्वप्नं आणि ट्रॉफी यांच्यामध्ये एमिलियानो मार्टिनेज (Emiliano Martinez) या अर्जेंटिनाच्या गोलकिपरने फ्रान्सच्या पेनल्टीतून दोन गोल वाचवून इतिहास घडवला.



गोल्डन ग्लोव्हजने भूषवण्यात आलं

फिफा विश्वचषक फायनलमध्ये तुफान कामगिरी करणाऱ्या या स्टार गोलकिपरला गोल्डन ग्लोव्हजचा अवॉर्ड देण्यात आला. ४ वर्षांपूर्वी खेळल्या गेलेल्या विश्वचषकादरम्यान हा अर्जेंटिनाचा स्टार प्लेअर प्रेक्षकांमध्ये बसून सामन्याचा आनंद घेत होता. आता ४ वर्षांनी त्याने मैदानात उतरत चमकदार कामगिरी केली.

हेही वाचा – दोन मिनिटांत फ्रान्सचे दोन गोल, मेस्सीचा कमबॅक अन् पेनल्टी! वाचा मिनिटां-मिनिटांला कसा पलटला गेम

४ वर्षांपूर्वी मेस्सीच्या संघातील हा खेळाडूने प्रेक्षकांमध्ये बसला होता. त्यावेळी त्याने प्रेक्षकांमध्ये बसूनच मैदानाचा सेल्फी घेतला होता. हा सेल्फी आता चार वर्षांनी चांगलाच व्हायरल होत आहे. मेस्सीने गोल करुन संघाला विजय मिळवून दिला, पण फ्रान्सच्या एम्बाप्पेने केलेले दोन गोल रोखणं मॅचचा टर्निंग पॉईंट होता. जर फ्रान्सच्या खेळाडूने केलेले दोन्ही गोल मेस्सीच्या संघातील एमिलियानो मार्टिनेजने रोखले नसते, तर मेस्सीचा संघ हा सामना जिंकू शकला नसता.

एक वर्ष आधीच केला होता अर्जेंटिनासाठी डेब्यू

महत्त्वाची बाब म्हणजे अर्जेंटिनाच्या या गोलकिपरने एक वर्ष आधीच अर्जेंटिनासाठी आंतरराष्ट्रीय डेब्यू केला होता. त्यानंतरच मेस्सीच्या संघाने दोन आंतरराष्ट्रीय किताब आपल्या नावे केले. या फिफा वर्ल्ड कपआधी झालेल्या कोपा अमेरिकादरम्यान अर्जेंटिना विजयी ठरली होती. या विजयात एमिलियानो मार्टिनेजने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हेही वाचा – फिफा वर्ल्ड कपची ट्रॉफी लाँच करण्यासाठी दीपिका पादुकोणचीच निवड का झाली; इथे वाचा कारण

चार वर्षांपूर्वी स्टेडियममध्ये बसला होता मार्टिनेज

चार वर्षांपूर्वी रशियाने आयोजित केलेल्या २०१८ विश्वचषकावेळी मेस्सीचा संघ अर्जेंटिनाचा फ्रान्सकडून पराभव झाला होता. त्यावेळी तेव्हा मार्टिनेज आपल्या भावासह रशियाच्या स्टेडियममध्ये इथेच उपस्थित होता. मेस्सीच्या त्यावेळच्या पराभवाचा मार्टिनेज साक्षीदार झाला होता. आज चार वर्षांनी त्याच मेस्सीच्या विजयाचा तो पुन्हा एकदा साक्षीदार झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here